मांदाड कब्रस्तान ते बंदराच्या रस्त्याची दुर्दशा पाच लाखाच्या कामाची झाली माती.. जनतेच्या पैश्याची उधळण.

53

मांदाड कब्रस्तान ते बंदराच्या रस्त्याची दुर्दशा पाच लाखाच्या कामाची झाली माती.. जनतेच्या पैश्याची उधळण

सचिन पवार

माणगांव तालुका प्रतिनिधी

मो: ८०८००९२३०१

तळा मांदाड ग्रामपंचायत हद्दीतील कब्रस्थान पासून बंदराकडे कडे जाण्याच्या रस्त्याची अक्षरशःदुर्दशा झाली आहे.पाच लाख रुपये निधीची मागणी झाली आहे.घाईघाईत ठेकेदाराने काम करून चुना लावला असल्याचे दिसून येत आहे.या कामाबद्दल ग्रामपंचायत पंचायत प्रशासन तोंडावर बोट ठेवून असल्याने दिसून येत आहे.

जनतेने कराच्या माध्यमातून शासनाकडे जमा झालेल्या पैश्याची स्थानिक प्रशासनाने उधळण केल्याचे दिसून येत आहे. एप्रिल – मे महिन्यात जवळपास पाच लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या 500 मीटर रस्त्याची माती झाली आहे.पंधराव्या वित्त आयोगातून काम करण्यात आले असल्याचे समजते.कामाचा निष्कृष्ठ दर्जा दिला आहे.खडी वर रोलर व्यवस्थीत फिरवला नाही डांबरची कमतरता मातीवर खडीचा एकच लेसर टाकला असल्याने पहिल्या पावसातच वाहून गेला आहे.हा वर्दळीचा रस्ता असून नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आह रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे.अश्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मांदाड ग्रामपंचायतीचा कारभार जनतेसमोर आला आहे. 

या बाबतीत मांदाड ग्रामपंचायत सरपंच यांना विचारलं असता ” आम्ही कंत्राटदाराला पूर्ण रक्कम अदा केली नसून कंत्राटदार पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करणार आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचा निधी दुरुस्तीसाठी मिळवून देणार नाही कारण शेवटी हा निधी जनतेचा असतो – श्री.तानाजी कालप सरपंच मांदाड ग्रामपंचायत ह्याची प्रतिक्रिया मीडिया वार्ता प्रतिनिधी जवळ करतांना दिली.