महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोन वर्षांची शिक्षा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोन वर्षांची शिक्षा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोन वर्षांची शिक्षा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🥏

वाशिम /मालेगांव : – सरकारकडून दोषसिद्धीचा दर वाढवण्यासाठी वेळोवेळी सरकारी परिपत्रके किंवा मार्गदर्शक तत्त्वांद्वारे दिशा निर्देश प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व स्टेशन प्रभारी यांना वारंवार माहिती देऊन व मार्गदर्शन करून दोषसिद्धीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

याच प्रयत्नातून आरोपी दामोदर संपत सहस्त्रबुद्धे वय 45 वर्षे व विलास बद्री पट्टेबहादूर वय 30 वर्षे दोघे रा.मुंगळा तालुका मालेगांव जिल्हा वाशिम यांच्यावर पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 418 / 2016 मध्ये भादवि च्या 354, 294, 506, 34 कलमान्वये महिलेच्या विनयभंगाच्या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये मालेगाव पोलिसांनी योग्य तपास करून प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट केले होते.
याप्रकरणी दोन्ही आरोपी दोषी आढळून आल्याने प्रथमवर्ग न्यायाधीश मालेगाव यांनी २८ जुलै रोजी दिलेल्या निकालात वरील दोन्ही आरोपींना दोन वर्षे कारावासासह प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास मालेगांव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी धोंगडे यांनी केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरभाऊ यांनी न्यायालयात मालेगाव पोलीस ठाण्यातून पैरवी अधिकारी म्हणून कारभार सांभाळला.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी किरण वानखेडे यांनी या प्रकरणात साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून या गुन्ह्यात शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले.✍