नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची फसवणुक
आरोपी अरुण राठोड विरुद्ध तीन लाख चाळीस हजाराने फसवणुक केल्याचा आरोप
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगाव : – अरुण हरचंद राठोड रा सारकिन्ही तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला या युवकाने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मेडशी येथील दोन युवकांची तीन लाख 34 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली असुन सदर घटनेची फिर्यादी जितेंद्र कुदळे यांनी 29 जुलै रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली .
जितेंद्र कुदळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मित्र अरुण राठोड याने त्याला व त्याचा मित्र चेतन राठोड राहणार मेडशी याला मी तुम्हाला मंत्रालयात नोकरी लावतो असे सांगून मी तुम्हाला आरोग्य विभागात किंवा पोस्टात किंवा टेलिफोन ऑपरेटर ची नोकरी लावून देतो . अशी थाप मारली . त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून १ सप्टेबर 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या महिन्याभरात तीन लाख 34 हजार रुपये उकळले . मात्र गेल्या दोन वर्षापासून आम्ही आज नोकरी लावेल उद्या नोकरी लावेल अशा आशेवर होतो . मात्र आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तशी फिर्याद त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला 29 जुलै रोजी दिली घटनेचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे का गजानन पांचाळ हे करत असून आरोपी अरुण राठोड विरुद्ध कलम 420 भादविनुसार गुन्हा दाखल केला आहे .✍