वरोडा तालुक्यात वीज पडून चार महिला ठार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
वरोडा, 30 जुलै : – वरोडा तालुक्यात आज शनिवार 30 जुलै रोजी वीज पडून चार महिला मृत्युमुखी पडल्या. शेगाव जवळील वायगाव भोयर येथे सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या चार महिलांवर वीज कोसळल्याने तत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वायगाव भोयर येथील शेतामध्ये काम करत असताना चार वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी चौघींनी झाडाचा आश्रय घेतला. आश्रय घेतलेल्या या झाडावर अचानक वीज कोसळली त्यात त्या चौघींचा मृत्यू झाला.
मृतकांमधे पंचायत समितीच्या माजी सदस्या हिरावती शालिक झाडे वय 45 , पार्वता रमेश झाडे वय 60, मधुमती सुरेश झाडे वय 20 व रीना नामदेव गजबे 20 या चौघीनचा समावेश आहे .एकाच वेळी वीज पडून चौघींचा मृत्यू झाल्याने शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावामध्ये शोककळा पसरली आहे.
घटनेचे पंचनामे करून मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती शेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक अविनाश मेश्राम यांना मिळताच ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. यात शेगावचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव. किशोर पिरके, महादेव सरोदे उपस्थित होते.