सर्पमित्र अतुल शर्मा यांनी आतापर्यंत दिले अनेक सर्पाना जिवदान, वाढलाय सापांचा वावर सावध राहण्याची गरज

सर्पमित्र अतुल शर्मा यांनी आतापर्यंत दिले अनेक सर्पाना जिवदान,
वाढलाय सापांचा वावर सावध राहण्याची गरज

सर्पमित्र अतुल शर्मा यांनी आतापर्यंत दिले अनेक सर्पाना जिवदान, वाढलाय सापांचा वावर सावध राहण्याची गरज

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

शहरात कोठे ही सर्प निघो आवाज दिल्यास तातडीने मदतीला पोहचणारे सर्पमित्र अतुल शर्मा यांनी आता पर्यंत अनेक सापांना जिवदान दिले तर नागरीकांच्या जीवाची रक्षा करुन त्यांना सरंक्षण दिले आहे मानवी वस्तीत वाढला सापांचा वावर सावध राहण्याची गरज
पावसाळा सुरू झाल्याने सापांच्या लपण्याच्या ठिकाणात पाणी येत आहे परिणामी विषारी बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत या कालावधीत मानवी वस्तीतही सापांचा वावर वाढतो तेव्हा सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात त्यामुळे पावसाळ्यात सापांपासून सावध राहणे आवश्यक आहे नाग,घोणस,मण्यार,फुरसे आदी प्रजाती विषारी असल्याने या सापांपासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे नाग,घोणस हेबारामाही बाहेर पडत असले तरी पावसाळ्यात त्यांचा प्रजननाचा कालावधी असतो बिळात पाणी गेल्याने सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पिलांसह साप बाहेर पडतात पूर्वी शेतात जंगलात सापांचे प्रमाण अधिक असायचे आता मानवी वस्तीत उंदरांचे प्रमाण वाढल्याने त्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे सर्पदंश झाल्यानंतर आपण घरगुती उपाय करीत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढते दंश झाल्यानंतर घाबरल्याने रक्ताभिसरण वाढते आणि विष जलद रक्तात मिसळते यासाठी तातडीने दवाखान्यात जाणे गरजेचे आहे सरकारी दवाखान्यात अँटिस्नेक ( एएसव्ही ) हे इंजेक्शन दिल्यानंतर विष उतरण्यास मदत होते
तर आतापर्यंत सर्पमित्र अतुल शर्मा यांनी वेगवेगळ्या विषारी जातीचे व मोठया सर्पाना पकडून त्यांना जिवदान दिले सर्प म्हटला म्हणजे लोकांची घाबरगुंडी उडते तर घरातील मंडळीचा जीव धोक्यात येतो अश्या परिस्थितीत शहरातील सर्पमित्रापैकी अतुल श्रीराम शर्मा शहरात कोठे ही सर्प निघाला असता त्यांना आवाज दिला व भ्रमणध्वनीवरुन कळविले तर हातातील कामे सोडून ते तातडीने घटनास्थळी हजर होतात तर किती ही मोठा व विषारी जातीचा सर्प असो त्याला पकडून जिवदान देण्याचे काम करतात लोकांच्या घरातून तसेच खुली जागा व अडचणीच्या ठिकाणावरुन पकडण्यात आलेले सर्प त्यांनी आतापर्यंत तपोवनच्या जगंलात नेऊन सोडले आहे सर्पमित्र अतुल शर्मा यांना यासाठी किती वेळ लागला व परिश्रम घ्यावयाचे काम पडले तरी ते दुकानदारीच्या कामाकडे लक्ष न देता निःस्वार्थ भावनेतून सर्वांना जिवदान देण्याचे नागरीकांना भयमुक्त करण्याचे काम मागील अनेक वर्षापासून करीत आहे.
तर त्यांना या कामात समाधान असल्याचे अतूल शर्मा यांनी सांगितले आहे.

बॉक्स
*वनविभागात नोंदणी शहरात पकडण्यात आलेले सर्प तपोवन जंगलात सोडण्यापुर्वी त्याबाबतची माहिती वनविभागाला दिल्या जात असून तशी नोंद केल्या जात असल्याचे ही सर्पमित्र अतुल शर्मा यांनी सांगितले*✍