बालविकास शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषण स्पर्धा

बालविकास शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषण स्पर्धा

बालविकास शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भाषण स्पर्धा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

मालेगाव :येथील तहसील कार्यालया जवळ बोरगाव रोड वरील श्री वेंकटेश सेवा समिती वाशिम द्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथ शाळा मालेगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुखाध्यापक श्री विठ्ठल भिसडे ,प्रमुख पाहुणे संतोष बाजड उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजनाने तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारअर्पण करण्यात आले. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील वर्ग १ते७ च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामधे
प्रथम क्रमांक अनम परवीन व्दितीय क्रमांक आयुष भगत, तृतीय क्रमांक रोहन घुगे प्रोत्साहन पर कोमल कांबळे, सृष्टी गायकवाड,श्रावणी टनमने यांना देण्यात आले. तसेच काही विद्यार्थी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे या महापुरूषांच्या वेशभूषा करून आले होते. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर विजयी स्पर्धकांना तसेच भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल कुटे, इब्राहिम रेघीवाले यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन अनम परविन व प्रिती धोटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गायत्री राऊत हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक नंदकिशोर भुसारी,विठ्ठल कुटे, अनिल सरकटे, वंदना गवई, जीजेबा घुगे, विजया भिसडे, गणेश शिंदे,अमोल बोडखे, गणेश ईढोळे, योगेश वाळुकर, सुषमा देशमुख, संदीप कांबळे तसेच शितल बोरकर स्वाती राऊत या सर्वांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.✍