साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351
:-आज दिनांक दिनांक 01ऑगस्ट 2022 रोज सोमवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी रक्षाबंधन या येणाऱ्या सणानिमित्त स.स्वतकृतीतून राख्या तयार केल्या. त्या तयार होणाऱ्या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वांना बांधण्यात येणार आहे तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु. कल्पना सुदर्शन रागीवार यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थित श्री सुरजलाल एल येलमुले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कु. कल्पना सु.रागीवार, बाबुराव बी. कोडापे, मुसली आर. जुमडे, अनंता के.सिडाम,कु. निलिमा एम. पातावार , सुरजलाल लिं. येलमुले व शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. शालेय जीवनात विद्यार्जनाचे किती महत्त्व आहे. याबद्दल आरोग्य मित्र विषयी माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे कु.संगिता रामगुंडम या विद्यार्थीनीचा आज वाढदिवस होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य गुरुनुले, या विद्यार्थ्यांने केले तर आभार प्रदर्शन शांतकुमार भगत या विद्यार्थ्यांने केले.