लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच्या १५३ व्या जयंती दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम उत्सहात संपन्न
✍ सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :-माणगांव तालुक्यातील निजामपूर रोड येथील कुणबी भवन हॉल मध्ये लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा याच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच्या जयंती निमित्त प्रथमता राजे छत्रपती शिवाजी महाराज , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , त्याच प्रमाणे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. या कार्यक्रमासाठी माणगांव तालुक्यातील त्याच प्रमाणे विशेष उपस्थित मान्यवर मा विजय आवास्कर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, मा मिलिंद साळवी उपाध्यक्ष राष्ट्रीय निवारण शक्ती, मा. नितीन गायकवाड कार्याध्यक्ष बुद्धीष्ट ईटरनॅशनल नेटवर्क, उमा किसन तारू रायगड जिल्हा अध्यक्षा, मौलाना सोलकर कोकण अद्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, सुरेश आग्रे रायगड जिल्हा अध्यक्ष क्राती सेना, मा. शशिकांत तानाजी भिगरंदेवे मा. बी. आर. झाडे रायगड जिल्हा प्रभारी, प्रोटान,मा. विष्णू लांडगे, मा. राणोजी लांडगे, मा. राजेंद्र भिसे, मा. राजेंद्र देशमुख, मा. वसंत किसन जाधव, मा. संतोष हरिश्चन्द्र माने,त्याच प्रमाणे इतर मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या १५३ व्या जयंती निमित्त प्रमुख वक्ते मा. किशोर जोधळे, डॉ. पी बी लोखंडे, डॉ. धनराज वाघमारे, व मा. शशिकांत तानाजी भिगरदेवे यांनी जग बदल घालुनी घाव गेले सांगुनी गज भीमराव हा अण्णा भाऊचा विचार समाजात रुजविणे ही काळाची गरज आहे. नवीन कामगार कायद्याचे अनुषंगाने अण्णा भाऊच्या विचाराची व आंदोलनाची प्रासंगिकता, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ही यह आझादी झूठी है देश की जनता भूखी है.या घोषणेची वास्तविकता एक चिंतन अशा पद्धतीने घोषणा देऊन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांची सांगता मा. लहुजी क्राती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा चे अध्यक्ष यांनी केले.