तळा शहरातील पाणी टंचाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आ.प्रवीण दरेकर. काँग्रेस अध्यक्ष खेळू वाजे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

तळा शहरातील पाणी टंचाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आ.प्रवीण दरेकर.

काँग्रेस अध्यक्ष खेळू वाजे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

तळा शहरातील पाणी टंचाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आ.प्रवीण दरेकर. काँग्रेस अध्यक्ष खेळू वाजे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश

✍ सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव :-तळा तालुका काँग्रेस अध्यक्ष खेळू वाजे आणि काँग्रेसचे पदाधिकारी, माजी सरपंच आणि कार्यकर्ते यांनी आ.प्रवीण दरेकर यांच्या मुख्य उपस्थित मुंबई येथे जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपा प्रदेश सचिव रविभाऊ मुंढे,भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.निलेश रातवडकर, राहटाड ग्रामपंचायत सरपंच चांगदेव पाटील,उपसरपंच अशोक खंडागळे,नगरसेवक रितेश मुंढे,नगरसेविका दिव्या रातवडकर,संदीप कदम,वैभव कदम,भैरव मेहता,सुरेश भाटे आदी मान्यवर उस्थितीत होते. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष खेळू वाजे,माजी उपसरपंच गंगाराम भो रवकर,माजी सरपंच महादेव आरडे रामा जगताप,प्रकाश चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आ.प्रवीण दरेकर यांनी भाजपची शाल घालून सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले व राष्ट्रवादी काँग्रेस वर जहरी टीका करत तळा शहरातील पाणी टंचाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप असल्याचे सांगितले.तळा शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमचे रवीभाऊ मुंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने पाणी योजना मंजूर करून घेतली. त्याचबरोबर वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले. मात्र या अत्यंत महत्त्वाच्या पाणी योजनेला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अप्रत्यक्षपणे आडकाठी आणण्याचे काम सातत्याने केल्याने ही योजना रखडली परंतु ते आता गेले आणि आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब यांचे सरकार आले असून तळा शहरातील पाणी योजना त्वरित मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तळा तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये सध्य इनकमिंग जोरदार सुरू असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस समोर कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे पाहायला मिळत आहे या पक्ष प्रवेशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला पाहायला मिळत आहे.