गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या हेटी नांदगावात आरोग्य तपासणी शिबीर पार पडले

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या हेटी नांदगावात आरोग्य तपासणी शिबीर पार पडले

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या हेटी नांदगावात आरोग्य तपासणी शिबीर पार पडले

शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो.न.9518727596

गोंडपिपरी:– वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या वाढदिवसा निमित्याने हेटी नांदगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गावकर्यांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घेतला.औषध तथा आरोग्य विषयक मार्गदर्शन उपस्थित वैद्यकीय चमूनी केली.
आरोग्य तपासणी शिबीरात डॉ. प्रदीप मंडल , डॉ. तझिन, डॉ. एम. बी. विश्वास, डॉ. शीतल यांनी ऋग्णांची तपासणी केली. मोफत औषधोपचार व आरोग्य सल्ला यवेळी दिला गेला. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.डॉ. प्रकाश तोहोगावकर, लक्ष्मण रामटेके, सुरेंद्र रायपुरे, राहूल मुंजनकर,भारत चंद्रागडे ,तेजराज डोंगरे,सूमेध मुंजनकर उपस्थित होते.