नवजीवन विद्यामदिर तळाशेत हायस्कुल मध्ये माथेफिरूचा धिंगाना १५ लाखाचे केले नुकसान.

नवजीवन विद्यामदिर तळाशेत हायस्कुल मध्ये माथेफिरूचा धिंगाना १५ लाखाचे केले नुकसान.

नवजीवन विद्यामदिर तळाशेत हायस्कुल मध्ये माथेफिरूचा धिंगाना १५ लाखाचे केले नुकसान.

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव:-माणगांव तालुक्यातील इंदापुर येथील नवजीवन विद्यामंदिर हायस्कुल तसेच कै.ग.द.तटकरे कनिष्ठ महाविद्याल तळाशेत येथे मंगळ वार दि.२ आँगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरून व्यक्तीने या हायस्कुल व महाविद्यालयाच्या इमारती परिसरामध्ये घुसून सात रूमचे सात लाँक तोडून आतमध्ये घुसून त्याने एकूण १५ लाख रूपयाचे काही मिनिटांत नुकसान केले आहे.
सविस्तर वृत्त असे की नवजीवन विद्यामंदिर तसेच कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्याल तळाशेत हे इंदापुर शहरापासून काहि अतंराच्या हाकेवर असून हे हायस्कुल व महाविद्याल मंगळवारी  सायंकाळी ५.३० वाजता बंद झाल्यानंतर एक अज्ञात माथेफिरून हा या हायस्कुल व महाविद्यालच्या इमारती परिसरा मध्ये घुसून एक दमात त्याने सात रूमचे लाँक तोडून त्यानी १० लाख रूपये किमतीचे साहित्य असलेल्या विज्ञान शाळेची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नासधूळ केली आहे. याच विज्ञान शाळेचे गेल्या महिनाभरात आ.आदितीताई तटकरे याच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तसेच हा माथेफिरू एवढयावरच न थांबता त्याने संस्थेच्याआँफिस मध्ये घुसून कागदपञ फर्निचर देखील तोडफोड केली,शिक्षक स्टाफरूम खुर्च्या,टेबल,फर्निचर,कागदपञाची नासधूळ केली आहे.शाळा संस्था विद्यार्थी यांचे संबधित कागदपञाची देखील नासधूळ,वर्गखोल्या मधील सरस्वती देवीची मुर्तीची तोडफोड केली आहे, हा सर्व प्रकार या परिसरातील काही नागरिकांनी बघितल्याने त्यांनी या हायस्कुलच्या शिक्षक वर्गाला त्वरित सांगितल्याने  नवजीवन विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्यद्यापक तसेच शिक्षक वर्ग हायस्कुल मधील कर्मचारी तसेच इंदापुर विभाग शिक्षण प्रसारक मंडळचे उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत,सचिव अविनाश मांडवरक,दिपकशेठ जाधव,उदय अधिकारी,समिर मेहता, बाळा खातू, मनोज जैन,नितिन घोणो,तसेच इंदापुरकर नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित होते.ही बातमी माणगांव पोलिस ठाणे यांना समजताच त्यांनी इंदापुर नवजीवन विद्यामंदिर येथे येऊन त्यांनी या जागेची पाहणी करून या अज्ञात माथेफिरू व्यक्तीला  त्यांनी अटक करून माणगांव पोलिस ठाणे  येथे घेवून गेले असून पुढील तपास माणगांव पोलिस हे करीत आहे.