रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी केला काँग्रेस पक्षात नाना पटोळे यांच्याहस्ते प्रवेश
✍ किरण बाथम✍
रोहा तालुका प्रतिनिधी
📞70205 41776📞
रोहा : – गणपतीपुळे हातखंबा रत्नागिरी येथील कुणबी समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले साहेब नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस नेते सुनील भाऊ सावर्डेकर समन्वयक व कोकण प्रभारी अनुसूचित जाती यांनी दिली. खारघर येथे सावर्डेकर गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.त्यांच्याच माध्यमातून आज हा पक्षप्रवेश झाला आहे.
काँग्रेस पक्ष आपल्या विचारांना बांधील राहून आजपर्यंत कार्यरत आहे. पुन्हा आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाना लोकांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुनील सावर्डेकर यांनी व्यक्त केला.
कुणबी युवाशक्ती सुरेश भगवान गावडे अध्यक्ष सुरेंद्र बेंद्रे उपाध्यक्ष प्रमोद इंगळे कार्याध्यक्ष गणेश साळवी सचिन प्रवीण रांगळे उपसचिव नरेश गोपाळ शरद साळवी अजित राणे ईतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
फोटो :- रत्नागिरी येथील कुणबी समाज कार्यकर्त्याचे काँग्रेस मध्ये स्वागत करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले तसेच इतर कार्यकर्ते व सुनील सावर्डेकर दिसत आहेत (छाया :-किरण बाथम )