त्वरित कर्जाच्या एप्लीकेशन पासून सावध रहा / सायबर फसवणूक ऑनलाईन कर्जापासून सावध रहा:
एडवोकेट अंकिता रा. जयस्वाल
दिवाणी आणि फौजदारी न्यायालय
वरूड. जिल्हा: अमरावती.
मित्रांनो, 2020 मध्ये आपल्या सर्वांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि अजूनही या काळात अनेकांना नौकरया गमवाव्या लागल्या आहेत, बरेच लोक बेरोजगारही आहेत, परंतु या काळात सायबर फसवणुकी ची प्रकरणे वाढली आहेत.
बरेच लोक ई-मेलद्वारे, साइबर फ्रॉडद्वारे अनेक मेसेजेस पाठवले जात आहेत. इंस्टेंट लोन ची जहिरात सोशल मीडियावरही दिसतात.ती जाहिरात पाहून कर्जाच्या आमिषात असलेले बेरोजगार लोक त्वरित कर्जाचा ऐप डाउनलोड करतात. ते ऐप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्वरित कर्जासाठी तुमची स्वतःची माहिती विचारल्यानंतर त्या ऐप ला परवानगी देता, परंतु त्या ऐपॅ मध्ये आधार कार्ड आणि पॅनकार्डची माहिती विचारली जाते, त्यानंतर त्वरित कर्ज 1000 रुपयां पासून मंजूर केले जाते. 25000 पर्यंत कर्ज मंजूर आणि बँक खात्यात जमा केले जाते. पण त्वरित कर्ज दिल्यानंतर काही दिवसानंतर कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मेसेजेस व कॉल येतात, त्या वेळी दररोज असे म्हटले जाते की ते 1000 ते 1500 रुपये भरा आणि व्याजही वाढवले जाते आणि आता हफ्ता भरला नाही तर घाणेरडी शिवीगाळ आणि खूप वाईट भाषेमधील संदेश पाठवले जातात. आम्ही कायदेशीर विभागा कडून बोलत आहोत, जर तुम्ही हफ्ता भरला नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे धमकीदायक संदेश आणि कॉल देखील येतात, एवढेच नव्हे तर पोलिसांच्या नावे खोटी नोटीस तयार केली जातात आणि पाठवले जातात, ज्यामुळे बरेच लोक सायबर फसवणूक करतात आणि इन्स्टंट लोन, अल्फा कॅश, स्वीट कॅश, मनीक्लिक, वाययू कॅश, व्ही रुपये अशा अनेक अॅप ला लोकं बळी पडतात. यामुळे बरेच लोकं आत्महत्या चा प्रयत्न करतात. अश्या सर्व अप्लिकेशन पासून सावधान राहण्याचे आवाहन मी तुम्हा सर्वांना करते!
तारक मेहता चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली
सायबर फसवणूकीवरून अभिषेकला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे, त्यामुळे त्याचा जीव गेला. 27 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केलेल्या प्रख्यात लेखक अभिषेक च्या कुटुंबातील सदस्यांनी आरोप केलेला आहे की अभिषेक ला सायबर फ्रॉड करून ब्लॅकमेल केले गेले आहेत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळालेल्या आत्महत्येच्या नोटातून मिळाली आहे. अभिषेक आर्थिक अडचणींशी झगडत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या घरातील सदस्यांना त्याच्या समस्यांविषयी माहिती नव्हती अशी माहिती मिळाली आहे, त्याचा भाऊ जॅनिस यांनी सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर जेनिसला धमकीचे संदेश आणि कॉल येत होते, त्यानंतर त्याने अभिषेकचा ईमेल पत्ता तपासला. अभिषेकने इझी लोन अर्जावरुन लहान कर्ज घेतले होते,
भारताच्या वेगवेगळ्या भागातून तसेच बांगलादेश आणि म्यानमार येथून जानीस यांना फोन करून पैसे मागितले जात आहे, आणि अभिषेकच्या मेलची तपासणी केली असता हे उघड झाले व्यवहारावर, असे आढळले की एक लहान लहान रक्कम जमा केली जात होती ज्याचा व्याज 30% होता. मित्र हो म्हणण्याचा अर्थ असा आहे की मी नेहमीच आपल्या सर्वांना माझ्या लेखाद्वारे जागरूक करून देते , अभिषेक सोबत जे काही घडले ते आपल्यापैकी कोणासही होऊ नये म्हणून हा लेख वाचून आपण सायबर फसवणूकीपासून स्वत: चे रक्षण करण्यास जागरूक व्हाल! माझ्याशी संपर्क साधण्यासाठी फेसबुक वर Legal Awarness talk by advocate Ankita R. Jaiswal पेजला भेट द्या. मला आशा आहे की आपण सायबर फसवणूक काय आहे आणि त्याबद्दल जागरूक कसे व्हावे याबद्दल सर्व काही सांगण्यास मि यशस्वी ठरली.