वाशिम जिल्ह्यात सुब्रोतो फुटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न

49

वाशिम जिल्ह्यात सुब्रोतो फुटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय उत्तम पडघान

मो: 735005054

वाशिम: मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रथमच खेळाडुंना सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेतून नव संजीवनी मिळाली. कोरोना काळानंतरच्या जिल्ह्यातील पहिल्याच सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा ०३ ते ०४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा यशस्विरीत्या संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले. जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव जनाब रफिक नामु यांच्या अध्यक्षतेखाली, प्राचार्य श्री. ठाकरे, स्पर्धा संयोजक राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी संजय पांडे, मिलींद काटोलकर, प्रल्हाद आळणे, सुरेंद्र अहीर, राजदीप मनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुब्रोतो क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील मुलांच्या गटात पोद्दार इंटरनेशनल स्कुल, वाशिम या संघाने मांउट कार्मेल, वाशिम संघावर १-० ने विजय संपादन केला. १७ वर्षाच्या आतील मुलींच्या अंतीम सामन्यात हॅपी फेसेस संघाने कानडे इंटनॅशनल संघांचा १-० गोल ने पराभवर करीत विजेते पद पटकावले. १७ वर्षाच्या आतील मुलांच्या अंतिम सामन्यात पोद्दार इंटरनॅशनल स्कुल व माउंट कार्मेल यांच्यात लढत होऊन ४-० ने पोद्दार इंटरनॅशनल स्कुल विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेतील विजयी संघ अमरावती येथे होणाऱ्या विभागीय सुब्रोतो

मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेकरीता पात्र ठरला आहे. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता पंच प्रमुख स्वप्नील बावीस्कर, स्वप्नील सरकटे, सुशांत रामावत, साहिल मस्के, श्रवण सरनाईक, शुभम कोल्हे, प्रतिक कोकाटे, श्रृतीत कोकाटे, गणेश चिखलकर, रोशन तिवाले, पवन कोकाटे आदींनी परिश्रम घेतले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील भारत वैद्य, कलीम मिर्झा, शुभम कंकाळ, भागवत मापारी, इंटरनॅशनल युथ क्लब व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी सहकार्य केले.