बिबट्याचा शेळ्याच्या गोठ्यावर हल्ला,दोन शेळ्या ठार, सावली येथील घटना

54

बिबट्याचा शेळ्याच्या गोठ्यावर हल्ला,दोन शेळ्या ठार, सावली येथील घटना

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

मो: 7263907273

सावली: सावली शहरातील वार्ड क्र 16 येथील सुरेश गूंडुरुकवार यांच्या घराच्या बाजुलाच असलेल्या शेळ्याच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार के ल्या तर एक शेळी उचलून नेली,

 शेळ्यांना नेहमीप्रमाणे आज गोठ्यातुन.बाहेर काढत असताना 3 शेळ्या कमी आढळल्या,व एक शेळी ठार झाल्याची दिसली,आजूबाजूला पाहिल्यावर त्या परिसरात बिबटचे पगमार्क दिसून आले,बिबट पिल्यांना सोबत घेऊन आली असे पगमार्क वरून दिसून येते,त्यानंतर ईतरत्र परिसरात शोध घेतल्या वर एक शेळी ठार,एक शेळी उचलून नेल्याने तीन.शेळ्या बिबटने ठार केल्याचे दिसुन येते..

 याची माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली ,सावली वन परीक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री राजु कोडापे, वनरक्षक विश्वास चौधरी घटनास्थळी पंचनामा केलेला आहे, नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसान ग्रस्त शेळी मालकाने केली आहे.

सदर घटना हि रात्रीच्या सुमाराची असुन पहाटेच्या वेळी शेळी मालक गोठ्यात गेल्यानंतर उघडकीस आली..