नागभीड येथे मंडल यात्रेचे स्वागत, विविध विषयावर मार्गदर्शन

50

नागभीड येथे मंडल यात्रेचे स्वागत, विविध विषयावर मार्गदर्शन

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

नागभिड—7 ऑगस्ट ला असलेल्या मंडल दिनाचे औचित्य साधत ओबीसी,(व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी.) विद्यार्थी व समाजबांधव यांच्या मध्ये विविध विषयांवर तसेच मंडल आयोगाच्या बाबतीत जनजागृती व्हावी तसेच राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी चा कॉलम समाविष्ठ करून घेणे,मंडल आयोगाचे महत्व समजावून सांगणे,महाज्योती संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांची माहिती देणे,नॉन क्रिमिलियरची अट रद्द करणे,ओबीसी,व्ही.जे.एन.टी.,एस.बी.सी.विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळवून देणे,ओबीसी,व्ही.जे.एन.टी.,एस.बी.सी. शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर शेती साहित्य उपलब्ध करून देणे, ओबीसी,व्ही.जे.एन.टी.,एस.बी.सी. विद्यार्थ्यां साठी घोषित केलेल्या 72 वसतिगृह सुरू करणे इत्यादी उद्देश लक्षात घेता यासाठी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान विदर्भातील 7 जिल्ह्यात मंडल यात्रेचे आयोजन केलेले आहे.

 दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी नागभीड येथे ओबीसी विचारमंच नागभीड च्या वतीने रुक्मिणी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मंडल यात्रेचे आगमन झाले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या मंडळ यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी युवा अधिकार मंच चे राष्ट्रीय संयोजक उमेशजी कोराम, संघर्ष वाहिनी नागपूर चे दीनानाथ वाघमारे,सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे बळीराज धोटे,सिनेट सदस्य अँड.गोविंद भेंडारकर,अध्यक्ष स्थानी जनता शिक्षण संस्थेचे सदस्य चक्रधर रोहनकर,भाऊराव राऊत,धीरज भिसिकर, मुकुंद अडेवार यांची उपस्थिती होती. यावेळी पी.बी.मंडळ व व्ही. पी.सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्तविक श्रीकांत राऊत यांनी केले तर स्वागतपर भाषण अँड. गोविंद भेंडारकर यांनी केले. उमेश कोराम,दीनानाथ वाघमारे,बळीराज धोटे यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले.

 सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओबीसी विचारमंच नागभीड चे अँड. गोविंदराव भेंडारकर, हरिश्चंद्र मेहेर, मधुकर डोईजड, शिरिष वानखेडे, प्राचार्य डॉ.गणपत देशमुख , सुरज भेंडारकर, मनिराम सहारे, मनोहर मेश्राम, तेली समाज अध्यक्ष विनायक चिलबुले, गुलाबराव भानारकर, 

ॲड ,देविदास करकाडे, सुरेश पालपणकर, सचिन कठाणे, प्रा.निलेश गोडे, महेश ठाकरे, डॅनिअल देशमुख, हरिष मुळे, मनोज लडके, गिरिश नवघडे, सुनिल पाथोडे, विजय भेंडारकर, चेतन भोयर, स्वप्निल नवघडे , प्रशांत पाल, चेतन उरकुडे,अतुल उरकुडे,शुभम देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमाचे संचालन पराग भानारकर यांनी प्रास्ताविक श्रीकांत राऊत तर आभार हरीचंद्र मेहर यांनी मानले.