सुरजागड लोह वाहतूक वाहनांमुळे नागरिक त्रस्त, रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य

ता.प्रतिनिधी मुलचेरा 

महेश बुरमवार

मो.न. 9579059379

मुलचेरा – काल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर चौडमपल्ली गावाजवळ सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहन रस्त्यावर खड्यात फसल्याने विरुध्द दिशेने येणारी राज्य परिवहन महामंडळ ची बस रस्त्याच्या खाली उतरवल्या मुळे बस सुध्दा चिखलात फसली, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पुर्णपणे कोलमडली . संपुर्ण महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. अशात 3 तास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहनांमुळे आष्टी ते आलापल्ली पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची इतकी दुरावस्था झाली आहे की, रस्त्यावर खड्डे का खड्यात रस्ता आहे हेच कळत नाही.

अशा रस्त्यावर प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच या मार्गावर धुळीचे साम्राज्य इतकं जास्त पसरले आहे, समोरुन येणारे वाहने पण धुळीमुळे दिसत नाही ,पुर्ण धुळ प्रवाशांच्या नाकात, डोळ्यात, तोंडांत जात असल्याने आरोग्यावर सुध्दा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अपघाताचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे.

या भागातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी वेळेवर लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती लवकरात लवकर करावी , अन्यथा आलापल्ली ते आष्टी क्षेत्रातील नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करू, असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here