भारत मुक्ती मोर्चा तर्फे भीमा कोरेगांवच्या दंगलीच्या चौकशीच्या आयोगासमोर पोलिस प्रशासनाने मूळ व्हिडिओ सोबत छेडखाणी करून चुकीचे पुरावे सादर केले,त्याविरोधात शरणबद्ध आंदोलन
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- 1जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला केला गेला, दगडफेक केली,गाड्यांच्या काचा फोडून जाळपोळ करण्यात आली. तसेच ग्रॅनाईट सुद्धा फोडण्यात आले आले.
या दंगलीचा निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकरी जनतेने भीमा कोरेगाव दंगलीच्या संदर्भात आयोग नेमला जावा अशी मागणी केली.तत्कालीन महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दंगली संदर्भात आयोग तर नेमला पण महाराष्ट्र सरकारने या आयोगाला कोणत्याच प्रकारचा साथ सहयोग दिला नाही. तसेच भीमा कोरेगाव चौकशी आयोगा समोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये पोलीस प्रशासनाद्वारे सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड करून पुरावे संपवले जात आहेत. या विरोधात भारत मुक्ती मोर्चा च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चरणबद्ध आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून जामनेर तहसील कार्यालया समोर
दिनांक:- ८/८/२०२२ वार- सोमवार रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले
या उपोषणात
मा.निलेश हिवाळे भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष, मा.राजेभाऊ खरे बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक जळगाव, मा.राहुल सपकाळे भारतीय बेरोजगार मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष व संपर्क महासचिव खानदेश प्रभारी, मा. भास्कर जोहरे बहुजन मुक्ती पार्टी जामनेर तालुका अध्यक्ष, मा. मधुकर जोहरे नफ जामनेर तालुका अध्यक्ष, मा. सायबु तडवी आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका अध्यक्ष, मा. मयूर पाटील छत्रपती क्रांती सेना जामनेर तालुका अध्यक्ष, गौतम इंगळे,उज्वल निकम,महिंद्र सुरवाडे,विजय निकम यांनी सहभाग घेतला.