अहेरी उप-जिल्हा
सिरोंचा तालुका अंतर्गत रेगुंटा पोलिस स्टेशन कडून
जीवनावश्यक वस्तूचे मोफत किट वाटप कार्यक्रम
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप- जिल्हा प्रतिनिधि
मो 9422891616
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अहेरी : – 07/08/2022 रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे सा.संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुहास शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोलीस स्टेशन रेगुंठाअंतर्गत उप पोस्टेचे आवारात रेगुंठा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावातील गोरगरीब आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे अमर स्वरूप फाउंडेशन, पुलक मंच परिवार नागपूर व पोलीस दादोलोरा खिडकी रेगुंठा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून मोफत किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाकरिता अमर स्वरूप फाउंडेशन, पुलक मंच परिवार नागपूर मधील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री मनोज बंड साहेब, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री सुहस खरे साहेब, श्री अशोक नागपुरे, श्री रोहित तायवाडे,श्री राहुल मोहूर्ले,श्री पवन चौधरी, श्री रघुवीर मेश्राम, श्री राहुल पांडे, श्री सुनील रोहनकर, तसेच हद्दीतील सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सदर कार्यक्रमास हजर होते *हद्दीतील एकूण 101 गोरगरीब व गरजू लोकांना सदरचे जिवाणूवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले* सदर किट मध्ये
1) पाच किलो तांदूळ
2) एक किलो साखर
3) अर्धा किलो गोड तेल
4) पाच किलो गव्हाचे पीठ
5) 250 ग्रॅम चाय पत्ती
6) अर्धा किलो तूर डाळ
7) अर्धा किलो मूग डाळ
8) अर्धा किलो शेंगदाणे
9) अंगाचा एक साबण
10) कपड्याचा एक साबण
इत्यादी वस्तूंचा सदर किट मध्ये समावेश करण्यात आला होता एकूण दोन टन जिवाणूशक वस्तूंचे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोकांना वाटप करण्यात आलेले आहेत तसेच प्रभारी अधिकारी श्री विजय द सानप पोलीस उपनिरीक्षक श्री सागर पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री निजाम सय्यद व पोलिस ठाणे येथील सर्व पोलिस अमलदार हजर होते तसेच प्रभारी अधिकारी श्री विजय द सानप गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन गावातील नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मा श्री. सुहास खरे साहेब यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले