सुरजागड वाहन राष्ट्रीय महामार्ग 353 वर रस्त्यावर मधोमध फसल्याने ट्रॅफिक जॅम
ता. प्रतिनिधी मुलचेरा
महेश बुरमवार
मो.न.9579059379
मुलचेरा आज सकाळी आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर शांती ग्राम व दामपुर गावाच्या मधात सुरजागड लोह वाहतूक करणारी वाहन रस्त्यावर खड्यात फसल्याने ट्रॅफिक जॅम झालेली आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे…याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे..
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर आलापल्ली ते आष्टी पर्यंत राष्ट्रीय महामार्गाची अवस्था इतकं बेकार झाला आहे की रस्ता दिसत नाही फक्त खड्डे च खड्डे दिसतात..या भागात रोज एका ठिकाणी सुरजागड लोह वाहतूक करणारी ओव्हर लोड वाहन रस्त्यावर फसतो आणि वाहतूक पुर्ण पणे ट्रॅफिक जॅम होत असते.. या परिसरात नागरिकांना यांचं खूप त्रास सहन करावा लागत आहे..
प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे की या राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती लवकरात लवकर करावी… अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही…अशी भावना या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे…..