सिरोंचा तालुक्या मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रशाशना कडून जन जगृति
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधी
मोब 9422891616
सिरोंचा: – तालुका मुख्यालय सिरोंचा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रकल्प सिरोंचा अंतर्गत “हर घर तिरंगा हर घर पोषण”कार्यक्रमाला सुरुवात करून त्या अंतर्गत संपूर्ण तालुका प्रशासनाच्या सहकार्याने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रकल्प सिरोंचा येथून रैली काढून हर घर तिरंगा फडकावत असताना तिरंग्याचा सन्मान राखला जावा ह्या उद्देशाने रैली काढून, ध्वज साहिंता समजावून सांगण्यात आली.त्यावेळी उपस्थित मान्यवर मान.तहसीलदार जितेंद्र सिकतोडे साहेब, बिडीओ घोडे साहेब,तालुका कृषी अधिकारी दोंदे साहेब, मुख्याधिकारी विशाल पाटील साहेब नायब तहसीलदार पुपालवार साहेब, सीडीपीओ पटले साहेब तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा आणि मोठ्या सांख्येत आंगनवाडी सेविका उपस्थित होत्या व संपूर्ण आयसीडीएस टीम प्रकल्प कार्यालय सिरोंचा चे पदाधिकारी उपस्थिति होते