आलापल्ली परिसरात बिबट चे अस्तित्व, नागरिकांनी सावधानता बाळगावी वनविभागाचे आवाहन

आलापल्ली परिसरात बिबट चे अस्तित्व, नागरिकांनी सावधानता बाळगावी वनविभागाचे आवाहन

आलापल्ली परिसरात बिबट चे अस्तित्व, नागरिकांनी सावधानता बाळगावी वनविभागाचे आवाहन

स्वप्निल श्रीरामवार
मो न 8806516351
अहेरी तालुका प्रतिनिधी

आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या आलापल्ली नागेपल्ली परिसरात काल रात्री एक बिबट आढळून आला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
आलापल्ली वन विभागा अंतर्गत अहेरी आणि आलापल्ली वनपरिक्षेत्र एक मेकांना लागूनच असल्याने सद्या परिस्थितीत या दोन्ही वन परिक्षेत्रात या बिबट चे अस्तिव दिसून येत आहे, अहेरी वन परिक्षेत्रातील नागेपल्ली येथील आय टी आय परिसरात या बिबट चा वावर असून तो काल रात्री च्या सुमारास आलापल्लीला लागून असलेल्या नागेपली आय टी आय च्या मागील परिसरात काही लोकांना या परिसरात शेताकडे जाताना दिसला अशी माहिती प्राप्त झाली, या वृत्ताला वनविभागाने बिबट चे अस्तिव असल्याचा गोष्टी ला दुजोरा दिला असून नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे, स्थानिक गावातील शेतकऱ्यांना शेतात काम करीत असताना सतर्क राहून कामे करण्याच्या सूचना देण्यात आले. पहाटे गावाच्या बाहेर जास्त लांबवर दूर फिरायला जाऊ नये, विनाकारण गावाच्या बाहेर जंगलाकडे जाऊ नये, नाल्याकडे एकटे दुकटे विनाकारण फिरू नये, सायंकाळी विनाकारण गावाबाहेर फिरायला जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केले आहे. आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या देखरेखित आरती मडावी वन परिक्षेत्र अधिकारी अहेरी यांची चमू बिबट वर देखरेखीसाठी सतत जंगल परिसरात गस्त करीत आहे,
आज बिबट्या च्या पाऊल खुणा शोधून बिबट्या कोणत्या दिशेला गेला याचा शोध/अंदाज घेण्यात आला. बंबारा नाल्याच्या काठाने लक्ष्मण नाला ओलांडून नागेपल्ली, रामपूर च्या जंगलाच्या दिशेने गेल्याचे दिसून आले.