अडेगांव ग्रामपंचायतीने प्रभात फेरीच्या माध्यमातून राबविला हर घर तिरंगा उपक्रम

अडेगांव ग्रामपंचायतीने प्रभात फेरीच्या माध्यमातून राबविला हर घर तिरंगा उपक्रम

अडेगांव ग्रामपंचायतीने प्रभात फेरीच्या माध्यमातून राबविला हर घर तिरंगा उपक्रम

शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो.न.9518727596

गोंडपिपरी:– ७५ वर्षे पूर्वी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक भारतीय शूरवीरांनी, क्रांतिवीरांनी, संग्राम सेनानी लढा दिला. स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक क्रांतिकारी शूरवीर शहीद झालेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात शूर संग्राम सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.१५ ऑगस्ट १९४७ मध्ये आपला भारत देश स्वातंत्र्य झाला.

येत्या१५ आगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढ्यासाठी लढलेल्या शूरवीरांचा गौरव आणि भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा तिरंगा अमृत महोत्सव केंद्र सरकारने हर घर झेंडा च्या माध्यमातून साजरा करावा अशा सूचना दिल्या.

स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकांनी येत्या १५ ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर देशाचा मान, देशाभिमान हर घर तिरंगाच्या माध्यमातून दिनांक १३ ऑगस्ट २०२२ पासून १५ अगस्ट २०२२ पर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरी तिरंगा लावावा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाचा उपक्रम घरोघरी राबवावा. अशी माहिती गावातील प्रत्येक नागरिकास हर घर तिरंगा प्रभात फेरी उपक्रमाच्या माध्यमातून अडेगांव ग्रामपंचायतिने दिली.
हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरीत प्रामुख्याने . ग्रा.पं.सरपंच रेखाताई चौधरी, ग्रा.प. उपसरपंच, विजय चौधरी ग्रा.प. सदस्य, शालिक झाडे ग्रा.प.सदस्य, अशोक कोवे ग्रा.प.सदस्य, अल्काताई नागापुरे ग्रामसेवक, पी.डी.राऊत, ग्रा.प.संगणक परिचालक नरेश झाडे, जिल्हा परिषद शाळा शिक्षक किशोर भोयर, अंगणवाडी सेविका जोस्तना पिपरे, जिजाबाई तिवाडे, अविनाश बटृॆ,शाळेचे विद्यार्थी व गावातील विशेष ग्रामसभेचे ग्रामस्थ व गावातील नागरिकांनी या हर घर तिरंगा उपक्रमात सहभाग घेतला.