तळोधी सोनुली (बूज)रस्त्याची दयनीय अवस्था

तळोधी सोनुली (बूज)रस्त्याची दयनीय अवस्था

तळोधी सोनुली (बूज)रस्त्याची दयनीय अवस्था

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—-पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे मागील काही दिवसापासून नागभिड तालुक्यातील तळोधी सोनुली या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खद्दा मध्ये पाणी असल्याने रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे , सदर रस्त्यावरून सोनोली ते तळोधी या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचून राहते परिणामी कधीकधी गाडी चालकांना व सायकल स्वारांना याच्या त्रास होतो कधी कधी पडण्याची भीती असते सोनोली (बूज )येथील विद्यार्थी नेहमीच तळोधी बाळापूर येथील शाळेत शिक्षणाकरिता जात असतात परंतु रस्ता खराब असल्यामुळे सायकल स्वारांना विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना,आजारी लोकांना तळोधीला येण्याकरिता खूपच त्रास सहन करावा लागतो आहे तरी बांधकाम विभाग यांनी या रस्त्याकडे जातीने लक्ष देऊन खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सोनुलीवासीय जनतेने केली आहे.