अंत्योदय प्रतिष्ठान मधील महिलांनी काढली आज मुंबई मधील मरीन लाईन्स येथे भव्य रॅली
मुंबई शहर प्रती निधी
राकेश नवले
मो नं : 8097130040
महाराष्ट्राची राजधानी तथा भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातील एक मुख्य आकर्षण व पर्यटकांची ओढ असलेले ठिकाण म्हणजे मरीन लाईन्स. अश्या या मरिन लाईन्स वर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईची लगबग पाहायला मिळतेच पण त्या सोबत आज हर घर एक तिरंगा या मोहिमेची माहिती लोकांपर्यंत साक्षात पोहोचविण्याचे काम अंत्योदय प्रतिष्ठान मधील महिला मोठ्या उत्साहात आणि जोशात करताना आपण पाहू शकता.
अतिशय कणखर स्वरूपात ” भारत माताकी जय ” अश्या घोषणा ही ऐकायला मिळतात . त्याचसोबत स्थानिक नागरिक व पर्यटकांनी देखील आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदविला होता.