रक्षाबंधन निम्मित भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राखी तयार करणे आणि चित्र रंगवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा प्रतिनिधी :- रक्षाबंधन निम्मिताने भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राखी तयार करणे आणि चित्रा रंगवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आनंदाने राखी बनवली चित्रा रंगवले व आपल्या कलेचे प्रदर्शन केले.शाळेचे मुख्यध्यापक अजबसिंग राजपूत व योगेश राजपूत यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व शिक्षिका वर्ग -मनीषा पाटील, बिलाल शेख, विजय बाविस्कर, मयुरी पाटील, जयश्री तहसीलदार, भारती तहसीलदार, कल्याणी पाटील, शुभदा जिवरग, जयश्री पाटील,दर्शना शार्दूल, पल्लवी सोनावणे, शारदा शिंदे व शिपाई वैष्णवी ठाकरे, व अनिता पाटील यांनी केले