मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली

मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

मालेगांव: – मालेगांव शहरातील 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त सध्या जिल्हाभरात प्रत्येक डिपारमेंट कडून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली असून मालेगाव पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत दिनांक 12 रोजी पोलीस विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी मोटरसायकल रॅली काढण्यात आली स्वातंत्र्याच्या अमृत्सोमहोत्सव वर्षानिमित्त सध्या देशभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला प्रथम सुरुवात मालेगाव पोलीस स्टेशनच्या गेट समोरून ते शिव चौक तसेच प्रत्येक चौकाचौकापर्यंत काढून रॅलीचा समारोप परत स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आला या रॅलीमध्ये पोलीस निरीक्षक किरण वानखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय तसेच सर्व संबंधित 40 च्या जवळपास कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली

मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मते जाहीर आवाहन दिनांक 13 14 15 तीन दिवस स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा परंतु त्याचवेळी ध्वज समितीचे पालन करून ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मालेगाव शहरात दिनांक 13 रोजी सकाळी नऊ वाजता निघत असलेल्या तिरंगा मोटरसायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे मत यावेळी मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्यावतीने करण्यात आले✍