हर घर तिरंगा अभियान अंतर्गत चणेरात भव्य रॅली
न्यु इंग्लिश हाय स्कूल उपक्रम
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी ✍
🪀 7972420502 🪀
रोहा: स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम वर्षभर शाळा स्तरावर व देश पातळीवर साजरा करण्यात येत आहे त्यानुसार आज हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी ना न्यु इंग्लिश हाय स्कूल चणेरे च्या विद्यार्थ्यांनी आज दि 12 ऑगस्ट रोजी भव्य रॅली चे आयोजन केले होते.
संपूर्ण देश पातळीवर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवशी शासकीय कार्यालयात तसेच प्रत्येक घरावर भारताचा झेंडा फडकविण्यात येणार आहे त्याच्या जनजागृतीसाठी शासनाच्या आदेशानुसार चणेरा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. न्यु इंग्लिश हाय स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ही भव्य रॅली काढली या रॅलीला हाय स्कूल चे मुख्याध्यापक
श्री एस के जोंधळे सर यांनी हिरवी झेंडी देऊन सुरुवात केली, ती रॅली हाय स्कूल येथून चणेरा मार्केट हुन खैरेखुर्द फाटा ते ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय मार्गे पुन्हा मुख्य रस्त्याने हाय स्कूल मध्ये आणण्यात आली त्यावेळी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन घरोघरी झेंडा लावण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले . ती रॅली हाय स्कूल मध्ये आल्यानंतर मानवी साखळीच्या साह्याने विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा तयार केला त्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 75 या अंकाची मानवी साखळी तयार करण्यात आली त्यानंतर हर घर तिरंगा अभियानाचे गीत व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
रॅलीला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक श्री गोपाळ टारपे, शिक्षिका श्रीम निवृत्ती चव्हाण,श्रीम सुरेखा वसावे,व इतर शिक्षक आणी कर्मचारी उपस्थित होते.