माजी कॅबिनेट मंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून अपघातामध्ये मरण पावलेल्या कुटुंबाला सांत्वनपर आर्थिक भेट
बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधि
7263907273
सावली : -काल झालेल्या रात्री ११.०० वाजता टाटा सुमो अपघातामध्ये विहिरगाव या गावामधील अनुप अजय ताडूरवार आणि सौ माहेश्वरी अनुप ताडूरवार यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात चार लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे. संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली असून दोघेही पती पत्नी यात मृत पावले.
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांनी समस्त कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना केली असून आर्थिक स्वरूपाची मदत पोहचविण्यात आली आहे. यावेळी सौ लता लाकडे नगराध्यक्ष, नगर पंचायत सावली, श्री नितीनजी गोहणे तालूकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सावली, श्री निखिल सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.