इस्रो संस्था स्थापना दिवस विशेष: गगनभरारीस भारताचे बळकट पंख

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे

मो. न: ७४१४९८३३३९

१५ ऑगस्ट, गडचिरोली

आपल्याला तर माहितीच आहे, की इस्रो ही भारतातील प्रमुख अंतराळ संस्था आहे. भारताला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी इस्त्रोचे मोठे योगदान आहे. अंतराळातील माहिती गोळा करणे आणि त्यावर संशोधन करणे हे इस्रोचे मुख्य कार्य असते. आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा जेवढा विकास झाला आहे, त्याचे श्रेय केवळ इस्रो या संस्थेलाच जाते. आयएसआरओ- इस्रो म्हणजे काय? तर इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला इंग्रजीत आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनायजेशन असे सुद्धा म्हणतो. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला अधिक मजबूत बनविण्यात आणि अंतराळ संशोधनाच्या विकासात इस्रोचे मोठे योगदान आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही अशी आपले कार्य पार पाडते- तिने दि.२२ सप्टेंबर २००८ रोजी भारताची पहिली चंद्रयान-१ ही मोहीम पार पाडली. फेब्रुवारी २०१७ रोजी एकाचवेळी आपल्या भारतदेशाचे १०४ उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करीत पूर्वीचा सत्तावीस उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला. मार्स ऑर्बिटर मिशन दि.२४ सप्टेंबर २०१४ रोजी यशस्वीरित्या पार पाडत मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश घेतला. या पहिल्याच प्रयत्नात, खुप कमी वेळेत आणि कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. सॅटेलाइट सुचालन प्रणाली तथा गगन व क्षेत्रीय सुचलन उपग्रह प्रणाली- आयआरएनएसएस विकसित केली गेली. तसेच उपग्रह आणि क्षेपणास्त्र- एसडीएससी हे श्रीहरीकोटा येथे एकत्रित आणि प्रक्षेपित केले जातात. विएसएससी मध्ये तिरुअनंतपुरम येथे रॉकेट लॉन्चर तयार केले जाते.

इस्रो ही भारतातील सर्वात मुख्य अंतराळ संशोधन संस्था आहे. तिची स्थापना दि.१५ ऑगस्ट १९६९ रोजी करण्यात आली. तिचे मुख्यालय बेंगलोर येथे स्थित आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्य देशभरातील विविध केंद्रांमधून संचलित होत असते. या संस्थेची स्थापना डॉ.विक्रम साराभाई यांनी केली. भारतामधील तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती घडून आली, त्यामागे या इस्रोचा खुप महत्वाचा वाटा होता. ही भारत सरकारची अंतराळ संघटना असून ती अवकाश संबंधित संशोधन करत असते. तसेच उपग्रह आणि तंत्रज्ञानाची ती निर्मिती देखील करते. इस्रोच्या माध्यमातून संशोधित केल्या गेलेल्या अनेक तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या विकासासाठी आणि देशातील इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. ती देशाच्या ऊ सुरक्षिततेच्या बाबतीत देखील महत्त्वाची भूमिका बजावते. भारताला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा प्रदान करण्याचे काम इस्रोकडे असते. सन १९६२ साली भारतदेशाने अंतराळ संशोधनासाठी एका संस्थेची स्थापना केली, त्या संस्थेला इंडिया नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजेच आयएनसीओएसपीएआर असे म्हणतात. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.विक्रम साराभाई यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सन १९६९ मध्ये डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली या समितीचे नाव बदलून आयएसआरओ- इस्रो असे ठेवण्यात आले. यानंतर पुढे सन १९७२मध्ये भारत सरकारने अंतरिक्ष आयोग म्हणजेच स्पेस कमिशन आणि अंतरिक्ष विभाग म्हणजेच डिपार्टमेण्ट ऑफ स्पेसची स्थापना केली. तेव्हा इस्रोला देखील या संस्थेच्या अंतर्गत घेण्यात आले. इस्रोचे मुख्यालय हे देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध असलेला राज्य म्हणजेच कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी स्थायिक आहे. सद्या इस्रोचे प्रमुख रॉकेटमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉ.के.शिवीन हे आहेत. यांत सध्या सतरा हजाराहून अधिक कामगार काम करतात. देशाची प्रमुख अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोचे पण एकेक प्रमुख केंद्रही देशभरामध्ये पाहायला मिळतात.

भारत देशामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण कार्यक्रमांसाठी इस्रो जबाबदार असते. इस्रो विविध कार्यक्रम घेऊन लोकांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे महत्त्व सांगत असते. या संस्थेची आपल्या भारत देशामध्ये अनेक केंद्रे आहेत. भारतातील इतर केंद्रांमध्ये सुद्धा अंतराळ संबंधित संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित केले जाते. इस्रोच्या अशाप्रकारच्या यशस्वी वाटचालीमुळे आपला भारतदेश आज स्वतः सॅटेलाइट आणि विविध अंतराळ उपकरणे तयार करतो. त्या उपकरणांना अंतराळ कक्षेत स्थापित करणारा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश बनला आहे. इस्रोच्या या यशस्वी वाटचालीमुळे आपला देश हा अधिकच प्रगतशील होत आहे, म्हणूनच आपला देश चंद्रावर मंगळावर देखील जाऊन आलेला आहे. तसेच विविध देशांचे तसेच खाजगी कंपन्यांचे उपग्रह आणि उपकरणे अंतराळ कक्षेमध्ये स्थापित करून इस्रो स्वतःचे उत्पन्न करीत आहे. इस्रो ही भारतातील अंतराळ संशोधन संस्था असून या संस्थेमार्फत अंतराळामध्ये होणार सर्व गोष्टींवर संशोधन केले जाते, तसेच विविध उपकरणे देखील अंतराळामध्ये सोडली जातात.

!! मीडिया वार्ता परिवारातर्फे रयतेचा कैवारी परिवारातर्फे इस्रो स्थापना दिनाच्या समस्त अवकाशप्रेमी भारतीय बांधवाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here