शहीद भगतसिंग प्रा. शाळा चंद्रपूर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा

55

शहीद भगतसिंग प्रा. शाळा चंद्रपूर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहात साजरा

मनोज एल खोब्रागडे

सह संपादक मीडिया वार्ता न्यूज

मोबाईल नंबर- 9860020016

चंद्रपूर : – शहीद भगतसिंग प्रा. शाळा चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम हर घर तिरंगा अभियानांतर्गत हातात तिरंगा ध्वज व घोष वाक्य तक्ते घेउन विदयार्थ्यांची जनजागृती रैली काढण्यात आली. दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. दिनांक १३ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दिनांक १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंद व उत्साहात पार पाडल्यानंतर भाषण व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा पार पडली, कार्यक्रमाचे मुख्य अतिथीं म्हणून वार्डातील जेष्ठ समाजसुधारक श्रीमान गौरीशंकर टिपले, सेवानिवृत्त सिमा सुरक्षा दलाचे श्रीमान गजानन तुराणकर, पोलिस विभात कार्यरत श्रीमान विवके मेश्राम, शाळेच्या मुख्याध्यापिका गासौं, परिणय वासेकर, पालक, विदयार्थी व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य अतिथी श्री टिपले, श्री तुराणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वासेकर मॅडम यांनी विदयार्थ्यांना मोलावे व प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.

मुख्य अतिथींच्या हस्ते विविध स्पर्धांत विजयी व सहभागी विदयार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन श्री प्रवीण आत्राम सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ पुष्पाताई बनकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी इतर सर्व शिक्षकवृंदावे व कर्मचारी तगवि मोलावे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.