रामपूर-सास्ती रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी शिवसेनेचे निवेदन, काम चालू न झाल्यास ठीय्या आंदोलनाचा इशारा

53

रामपूर-सास्ती रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी शिवसेनेचे निवेदन, 21 तारखेच्या आत काम चालू न झाल्यास 22 ला ठिय्या आंदोलन

खुशाल सूर्यवंशी

राजुरा तालुखा प्रतिनीधी

8378848427

तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे ओढवलेल्या पुरस्थितीमुळे राजुरा बामणी मार्ग बंद असून संपूर्ण वाहतूक ही सास्ती बल्लारपूर मार्गाने होत आहे.

वेकोली प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी तयार केला चेक पोस्ट ते बल्लारपूर हा मार्ग सर्वासामन्य लोकांसाठी खुला करून देण्यात आला यात काही गैर नाही. परंतु या मार्गाने होणाऱ्या जडवाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था खड्डेमय झाली आहे परिणामता कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पी डब्लू डी हद्दीतील सास्ती कॉर्नर ते चेकपॉस्ट मार्ग सुद्धा अतिशय बिकट अवस्थेत असून सामान्य नागरिक आणि कर्मचाऱ्यांना जीवघेना प्रवास करावा लागत आहे.

वेकोली प्रशासन याकडे उघड्या डोळ्याने बघून सुद्धा दुर्लक्ष करत आह. 21 ऑगस्टच्या आधी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू करण्यात यावे अन्यथा 22 आगस्टला शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्च्या आंदोलन करण्यात येईल अश्या प्रकारचे निवेदन

वेकोली, पीडब्लूडी आणि ठाणेदाराला देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, तालुका प्रमुख वासुदेव चापले, शहर प्रमुख राकेश चिलकुलवार, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, अभिजित मालेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.