आदित्य ठाकरेंच्या महाड येथील जनसंवाद यात्रेत हजारो शिवसैनिकांचा यल्गार
किशोर किर्वे
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):- काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली यामध्ये शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी करून भाजप सोबत युती करून सत्ता स्थापन केली यामुळे निष्ठावंत शिवसैनिक आक्रमक होऊन बंडखोरांचा उठाव करण्याचा निर्णय घेऊन यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली त्यानुसार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जनसंवाद यात्रेचे आयोजन करीत दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी महाड शिवाजी चौक येथे जनसंवाद यात्रेचे आयोजन केले होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना बंडखोर झालेल्या आमदारांना पक्षाने काय नाही दिले आमदार, मंत्री केले ओळख दिली नावारूपाला आणले आणि यांनी आपल्या स्वार्थासाठी गद्दारी केली आणि तिथेच नाही थांबले तर शिवसेनेवर आपला अधिकार असल्याचे सांगायला लागले म्हणून आम्ही गद्दारांना सांगत आहे राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा मग दुध का दुध पाणी का पाणी होऊ द्या निष्ठावंत शिवसैनिक तुमची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही यांचा पराभव अटळ आहे अशा प्रकारचा इशारा यावेळी दिला.
यावेळी माजी खासदार अनंत गिते यांनी आपले मनोगत व्यक्त करीत महाडच्या भुताला बाटलीत बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही कुणीही घाबरण्याचे कारण नाही मी व शिवसेना तुमच्या पाठीशी आहे यावेळी जनसंवाद यात्रेदरम्यान आजी-माजी, नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.