दहीहंडीला आता मिळणार खेळाचा दर्जा

दहीहंडीला आता मिळणार
खेळाचा दर्जा

दहीहंडीला आता मिळणार खेळाचा दर्जा

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

मुंबई, १७ ऑगस्ट
दहीहंडी या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उद्या गुरुवारी याबाबत विधानसभेत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते.
राज्याच्या क्रीडा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी त्याचे अधिकृत परिपत्रक काढले जाईल, असे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीच्या मंडळांकडून दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, शिंदे फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा द्यावा तसेच दहीहंडीदिनी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
या ऐतिहासिक निर्णयामुळे वर्षातून एकच दिवस होणाऱ्या दहीहंडीचे आता वर्षातील ३६५ दिवस आयोजन करता येणार आहे. तसेच दहीहंडीमध्ये मानवी मनोरा रचणारे गोविंदा आता खेळाडू म्हणून ओळखले जातील.