हरिहरेश्वर मध्ये सापडलेल्या बोटी चे ओमान कनेक्शन
शस्त्र साठ्यासह बोट आढळून आल्याने संपूर्ण राज्यात अलर्ट
रायगड जिल्ह्यासह मुंबईतही नाका बंदी
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि: 18/08/2022
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे दोन संशयास्पद बोट आढळून आल्या आहेत. इतकेच नाही तर या बोटवर तिन एके 47 रायफल्स काही जिवंत काडतूस आणि इतर साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
ही संशयास्पद बोट युकेमधील एका कंपनीच्या नावावर रजिस्टर आहे.
तसेच एका ऑस्ट्रेलियन व्यक्ती संदर्भात ही काही माहीती पोलीसांना मिळाली आहे.
ही बोट ओमान येथे रेस्क्यू करण्यात आली होती, तेथील प्रशासनाने ही बोट रेस्क्यू केल्यावर तेथेच अँकर करुन अडकवण्यात आली होती,मात्र समुद्र खवळलेला आसल्याने अँकर केलेली ही बोट तेथुन निघाली आणी भरकटत रायगड च्या समुद्र किनाऱ्यावर आली आसल्ये चे बोल्ले जात आहे.
सकाळी 8 वाजता स्थानिक नागरिकांना ही बोट दिसुन आली आणी बोटीवर शस्त्र साठा आढळून आला. या प्रकरणा ची माहिती रायगड पोलीसांना मिळताच ताबडतोब घटना स्थळी धाव घेऊन बोट व त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले.ही बोट युकेमधील असल्याची माहिती समोर येत आहे.
नेपच्यून मेरिटाइम सिक्युरिटी चे स्टीकर बोटीवर सापडले आहेत, एके 47 रायफल्स असलेल्या बॉक्सवर देखील हे स्टीकर आहेत,त्या मुळे शस्त्र असलेला हा बॉक्स मेरिटाइम सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपनीचा आसावा आशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.दोन्ही बोटी मध्ये कोणीही व्यक्ति आढळून आलेला नाही,
कोस्ट गार्ड व MMB यांना याबाबत सुचना देण्यात आलेल्या आसुन रायगड पोलीस विभागाकडून अवश्यक कारवाई करण्यात येत असून संपूर्ण राज्यात अलर्ट आसुन रायगड जिल्ह्यासह मुंबईतही नाका बंदी करण्यात आली आहे.