पंचायत समिती रोहा सेस फंडातील कामात भ्रष्टाचार कारवाईस टाळाटळ
पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून चौकशीअंत कारवाई ची मागणी
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:18/08/2022
रोहा: तालुक्यातील पंचायत समिती सेस फंडअंतर्गत झालेल्या कामांची माहिती माहिती चा आधिकार अधिनियम 2005,अन्वये 2015-16 ते 2021-22 या आर्थिक वर्षात पर्यंत कामांची यादी व कामांचे सद्य स्थितीतसह तसेच प्राप्त झालेल्या निधीसह ची माहिती मिळाली असून रोहा तालुक्यातील अनेक कामांत तफावत व अनियमिता आसुन ग्रामपंचायत खांबेरे येथील बिरवाडी कब्रस्तान येथे मुरुम टाकणे या कामा च्या नावावर काम न करता 80000/-( ऐंशी हजार मात्र)ची रक्कम खर्च करण्यात आली आसल्याची माहिती उघर झाली आहे. सदर विषयी पंचायत समिती रोहा येथे दि:27/05/2022,रोजी तक्रार केली आसता कामा च्या नावात बदल करून बिरवाडी ते खैरेखुर्द कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे ची माहिती दिली आसुन सदर कामा चे बनावटी कलर फोटो व विना तारख्याचे दाखले व सरपंच ग्रामसेवक यांच्या सह्यांचा करारनामा दिला आसुन सदर ठिकाणी कामच झाले नसल्याने माझी व शासना ची फसवणूक केलेली आहे.
सदर कामाच्या ठिकाणी कामाचा फलक ही लावला नसुन तोही कलर फोटो मध्ये बनावटी दाखविण्यात आला आहे.
सदर कामात भ्रष्टाचार झाला आसुन
सदर कामाची चौकशी उप अभियंता श्री गिरी (बांधकाम) उप विभाग रोहा यांनी दि:03/08/2022, केली आसुन सदर ठिकाणी मुरुम टाकण्यात आलाच नाही आशी फोनवरून माहिती दिली आहे.
सदर विषयी कोनतीही कारवाई करण्यात आली नसलेने सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे फोन वर विचारणा केले आसता कोनताही चौकशी आहवाल आला नसुन मा. गट विकास अधिकारी यांच्या कडून माहिती घेतो आसे सांगण्यात आले.
पंचायत समिती करुन जाणुन बुजून
दिरंगाई होतो का? कोणाचा दबाव आहे का?
आशे अनेक विषय समोर येत आसुन तक्रार माघार घणेस नेते मंडळी करुन फोनवर समज व संबंधित अधिकाऱ्यांकडून मध्यस्थ व्यक्तीन करुन मला आमिष दाखवणे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे आश्या आनेक धमक्या ही येत आसुन संबंधितांकडून माझ्या जिवीतास धोका आसल्याची डाट शक्यता असलेने सदर विषयी मा. पोलीस अधीक्षक रायगड यांची भेट घेणे कामी अलिबाग येथे गेलो आसता साहेब हरिहरेश्वर येथे शस्त्र साठ्यासह बोट आढळून आली आसल्या कारणाने भेट झाली नाही.
तरी मा.पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून सदर विषया ची चौकशी होउन संबंधित सरपंच ठेकेदार व अधिकारी यांच्या विरुद्ध चोरी शासना ची व माझी दिशाभुल आणि फसवणूक झाल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी मा. पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्याकडे करण्यात अली आहे.