जळगावत राजेशाही थाटात मराठमोळी दहीहंडीचे एल.के. फाउंडेशन तर्फे आयोजन

142

जळगावत राजेशाही थाटात मराठमोळी दहीहंडीचे एल.के. फाउंडेशन तर्फे आयोजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

विशाल सुरवाडे

मो:9595329191

जळगाव- जळगावत राजेशाही थाटात मराठमोळी दहीहंडीचे आयोजन शहरातील सागर पार्क येथे करण्यात आले, ललित कोल्हे यांच्या तर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. 

सागर पार्क मैदानावर एल. के. फाउंडेशन च्या वतीने प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी सोडण्याचे आयोजन करण्यात आले होते.

काही वेगळं करण्यासाठी त्यांनी दहीहंडीला तिरंग्याचा रंगात सजवलेली दहीहंडी पाहायला मिळाली.

दहीहंडीची उंची 60 फुटापर्यंत ठेवण्यात आली होती.

दहीहंडी फोडणाऱ्यास एक लाख ऐक्कावन हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

कोरोनामुळे दोन वर्ष दहीहंडी साजरी होऊ शकली नाही, त्यामुळे यावर्षी दहीहंडीसाठी प्रचंड स्वरूपात गर्दी पाहण्यास मिळाली. तेव्हा त्या ठिकाणी तरुणांचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला. ढोल ताशांचा पथक डीजे मधील गाणं थिरकली असल्याचे पाहायला मिळाले.

त्यात मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, महापौर जयश्री महाजन यांची सुद्धा उपस्थिती होती.

दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदांनी प्रयत्न केले परंतु तरुण कुडापा मित्र मंडळ यांनी दहीहंडीचा मान मिळवला.