धोंडखार येथे दहीहंडी सोहळ्यात खालुबाजा बंदच्या वादात पोलीस पाटलालाच मारहाण
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: तालुक्यातील धोंडखार गावात दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर गाव अध्यक्ष श्री जयेश हरिचंद्र घासाळकर यांनी खालुबाजा बंद केल्या चा राग धरून आरोपी सनी महादेव म्हात्रे यांनी केलेल्या वादा मुळे शांतता राखणे चे काम करीत आसताना पोलीस पाटील यांनाच शिवीगाळ करुन मारहाण करून सरकारी कामात आडथळा अणले आसता कळम 353,323,504,अन्वये रोहा पोलीस ठाण्यात अरोपी सनी महादेव म्हात्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आसुन अरोपी फरार आसुन रोहा पोलीस आरोपी चा शोध घेत आसल्याची माहिती पोलीस हवालदार (चणेरा बिड चे)श्री गदमळे यांनी दिली.
सविस्तर माहिती: धोंडखार गावात दि:19/08/2022 रोजी दुपारी 3वा.
दहीहंडी चा उत्सव असल्याने गाव चे पोलीस पाटील म्हणून लक्ष ठेवणे बाबत मा.पोलीस निरीक्षक श्री बाबर पोलीस ठाणे रोहा यांनी दिलेल्या सुचना प्रमाणे फिर्यादी दहीहंडीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्याचे काम करीत होते.
धोंडखार गावचे अध्यक्ष श्री जयेश हरिचंद्र घासाळकर यांनी अरोपी सनी महादेव म्हात्रे याच्या बरोबर शाब्दिक बाचाबाची चालु असल्याने अध्यक्ष यांनी सायंकाळी 04:30वा.फिर्यादी पोलीस पाटील यांना सदर ठिकाणी बोलवून घेतले असता गावातील सार्वजनिक गोविंदाची दहीहंडी फुटली असलेने अध्यक्ष यांनी खालुबाजा बंद करण्याचे सांगितले असता अरोपी सनी महादेव म्हात्रे हा रागात जोरजोरात बोल्ला की “खालुबाजा तुम्ही बंद का केलात” त्याचे वरुन वाद झाले आसता,
फिर्यादी पोलीस पाटील यांनी अरोपी याला समजावून सांगीतले की दहीहंडी कार्यक्रम झालेने अध्यक्ष यांनी खालुबाजा बंद केला ते बरोबर असते असे पोलीस पाटील या नात्याने शांततेच्या दृष्टीने ते सरकारी काम करीत असताना त्यांच्या कामात अडथळा आणुन अरोपी सनी महादेव म्हात्रे याने या गोष्टी चा राग धरून फिर्यादी पोलीस पाटील यांना शिवीगाळ करुन त्यांच्या कपाळावर फाईट मारली,
तेव्हा तेथे उपस्थित असलेले अध्यक्ष जयेश घासाळकर,शांताराम नारायण जोशी,पांडुरंग लक्ष्मण म्हात्रे,कृष्णा तुकाराम गावडे, सर्व राहणार धोंडखार व इतर लोकांनी अरोपी याला पकडून बाजुला केला, त्यानंतर अरोपी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत त्याच्या घरी निघून गेला.
तरी फिर्यादी पोलीस पाटील शांततेत काम करीत आसताना अरोपी ला श्री शंकर गजानन मांडळेकर हे पोलीस पाटील असल्या ची माहिती असताना ही शिवीगाळ करुन कपाळावर फाइट मारुन सरकारी कामकाजात अडथळाअणला म्हणुन फिर्यादी यानी अरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आसुन अरोपी फरार आहे.
पोलीस निरीक्षक श्री बाबर यांच्या मार्गदर्शना खाली अरोपी चा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असा खुलासा पोलीस हवालदार श्री गदमळे यांनी दिला आहे.