जन्माष्टमी महोत्सव ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे साजरा

52

जन्माष्टमी महोत्सव ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभिड येथे साजरा

अरुण रामुजी भोले

नागभिड तालुका प्रतिनिधी

9403321731

नागभिड: श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड, ता.नागभीड, जि.चंद्रपूर येथे दिनांक–20/08/2022 ला जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्माष्टमीच्या कार्यक्रमाच्या निमित्याने समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश तर्वेकर, सचिव श्री अजय काबरा, झेप निसर्ग संस्थेचे अध्यक्ष तथा समिधा सेवा संस्थेचे सदस्य श्री पवन नागरे, शाळेच्या प्राचार्या सौ. शुभंगी पोहेकर, मुख्याध्यापिका श्रीमती संगिता नारनवरे, शाळेचे संपुर्ण शिक्षक-शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

जन्माष्टमीच्या कार्यक्रमानिमित्य झेप निसर्ग संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे आणि सदस्य क्षितीज गरमडे व गुलाब राऊत यांनी सापांच्या चित्रांच्या माध्यमातुन सापांची ओळख, विषारी, बिनविषारी, सापांच्या जाती अशी सापांविषयी माहिती व साप चावल्यानंतरचे प्रथमोपचार या विषयी माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगीतली. तसेच राधा-क्रिष्ण वेशभुषा स्पर्धा, मठकी सजावट स्पर्धा, हांडी फोड स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या शेवटी मुलींनी दहीहंडी फोडुन जन्माष्टमीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमास शाळेचे विद्यार्थी ,पालक वर्ग बहुसंख्येनी उपस्थित होते,