आं.सुरेश भोळे यांच्या माध्यमातून हजारांवर शिधापत्रीकांचे वाटप ममुराबाद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य

आं.सुरेश भोळे यांच्या माध्यमातून हजारांवर शिधापत्रीकांचे वाटप
ममुराबाद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य

आं.सुरेश भोळे यांच्या माध्यमातून हजारांवर शिधापत्रीकांचे वाटप ममुराबाद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य

जळगांव प्रतिनिधी खंडू महाले मो.7796296480

जळगाव :- राज्यशासनाच्या विविध काल्याणकारी योजना या सर्व सामान्य गोर गरीब तसेच गरजुलोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी आ.सुरेश भोळे यांच्या जळगाव येथील नुतून मराठा महा विद्यालयाच्या व्यापारी संकुलातील कार्यालयाच्या माध्यमातून आता पर्यंत शहरी व ग्रामस्थांना हजारो शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. या साठी त्यांनी श्री.कैलास धुरेकर यांची सहायक म्हणून नियुक्ती केली आहे . गेल्या वर्ष भरा पासून केसरी , पांढऱ्या शिधापत्रिका तयार करून कार्यालयमार्फत त्याचे विना मोबदला केवळ शासकीय चलन फी भरून वितरण केले जात आहे . कारण कोणत्याही प्रकारच्या नवीन शिधापात्रिका मिळविण्यासाठी सर्व सामान्य जनतेला तहसील कार्यालयात अथवा पुरवठा विभागात तारेवरची कसरत करावी लागते . एवढे करून देखील गरजूंना लवकर शिधापत्रिका मिळत नाही . यासाठी आमदार भोळे यांनी स्वस्त धान्य दुकानातून गरीब कुटूम्बियांना लवकर शिधापत्रिका मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे . नुकतेच बळीराम पेठेतील भा.ज.पा कार्यालयात ममुराबाद येथील गरीब व गरजू लोकांना आ . राजूमामा भोळे यांच्या हस्ते केसरी शिधापात्रीकांचे वितरण करण्यात आले . या वेळी ममुराबाद च्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे . तसेच एक हजाराच्या वर बारा अंकी धान्य सुरु करण्यासाठी व्यापकप्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहे . या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी भाजपा चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ . राजूमामा भोळे ,नगरसेवक विशाल त्रिपाठी , माजी नगर सेवक प्रदीप रोटे , विनोद आढळके , खंडू महाले ,सहायक कैलास धुरेकर यांच्या सह विविध पदाधिकारी उपस्थित होते .