सख्या मुलीने केली आईची हत्या, अहेरीत खळबळ  हत्येत प्रियकराचा सहभाग

सख्या मुलीने केली आईची हत्या, अहेरीत खळबळ
 हत्येत प्रियकराचा सहभाग

सख्या मुलीने केली आईची हत्या, अहेरीत खळबळ  हत्येत प्रियकराचा सहभाग

अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप जिल्हा प्रातिनिधी
मोब 9422891616

अहेरी मुख्यालय येथील जुन्या तहसील कार्यालया जवळच्या परिसरात राहणाऱ्या निर्मला आत्राम वय 49 यांची त्यांच्या घरात तिच्या मुलीने आई ला टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
निर्मला यांची मुलगी उर्मिला चंद्रकांत आत्राम वय 22 हिने आपला प्रियकर रुपेश येनगंधलवार वय 22 याच्यासोबत मिळून ही हत्या केल्याची माहिती अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधिकारी शाम गव्हाणे यांनी सांगितले की, रात्री पोलीस अधिकारी गस्त घालीत असताना उर्मिला व रुपेश रस्त्याने संसायपदी
ये – जा करताना दिसले.यात पोलिसांना संशय आला व त्यांनी निर्मला यांच्या घरा कड़े जाउण बागितले असता त्यांचा राहत्या घरी त्यांची हत्या झाल्याचे दिसून आले वेळ वाया ना करता पोलिस पथकानी त्या दोघाना ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू आहे. मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहे. पुढील कारवाई अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने अहेरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी उर्मिला हीचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून उर्मिला हिचे मोठ्या कष्टाने पालनपोषण आईनेच केले होते. वडीलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती. पण जन्मदात्या आईची हत्या करण्याच्या कुबुद्धीने तिच्यावर गजाआड व्हावे लागण्याची वेळ आली.