मानव विकासच्या स्कूल बसचा अपघात

50

मानव विकासच्या स्कूल बसचा अपघात

ता.प्रतिनिधी /महेश बुरमवार

मो.न.9579059379

मुलचेरा :आज दिनांक २२/०८/२०२२ रोजी लगाम वरून शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस चालकाने नियंत्रण सुटल्याने बस अपघात ग्रस्त झाली.. सविस्तर वृत्त असे की ,शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हणून मानव विकास मिशन योजना अंतर्गत बसेस चालविल्या जातात, लगाम ते मुलचेरा या एक बस दिवसांत तिनं वेळा ये जा करते..आज सकाळी लगाम परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन मुलचेरा जात असताना मल्लेरा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला लागत बस जंगलात शिरली.

या बस मध्ये २०ते २५ विद्यार्थी उपस्थित असल्याचं माहिती आहे.यात चालक व वाहक तसेच काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली,सर्व जखमी ना ग्रामीण रूग्णालयात मुलचेरा येथे दाखल करण्यात आले.