महत्त्वाकांक्षी म्हसाडी धरणाचे काय झाले ? सिंचन फाइल्स चर्चेत,चणेरा विभागातील नागरिकांचा सवाल,
आमदार खासदार कडून दुर्लक्ष
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:24/08/2022
रोहा: तालुक्यातील चणेरे येथील म्हसाडी धरणाचे भूमीपूजन कार्यक्रमास आज 11 वर्ष पूर्ण झाली, परंतू म्हसाडी धरणावर बोलायला कोणीच आमदार खासदार तयार नाहीत. त्या मुळे म्हसाडी धरणाचे नेमके काय झाले? हे अधिकृत समोर अलेले नाही दरम्यान मागास चणेरा विभागात रिफायनरी प्रस्तावित आहे.नंतर सिडकोचे बस्तान,त्या नंतर बल्क ड्रग फार्मा आशी स्वप्ने विभागातील नागरिकांना दाखविण्यात आली.
पण राजकारणात सँडविच झालेल्या चणेरा वासियांच्या नशिबी आद्याप कोणाचेच प्रकल्प दिसत नाही. याच प्रकल्पा च्या अनुषंगाने म्हसाडी धरणाचा घाट दि:13 ऑक्टोबर 2011,रोजी घालण्यात आला.कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारातील तत्कालीन उप मुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री सुनील तटकरेंच्या हस्ते म्हसाडी धरणाचे भूमीपूजन झाले आणि धरणाचे काम लगेचच रखडले, धरणा साठी च्या विविध मंजुऱ्या नसताना धरणाचे भूमीपूजन करण्यात आले.रिफायनरी नंतर सिडको,बल्क पार्क ची चर्चा झाली.पण आद्याप कोणतेच प्रकल्प प्रस्तावित नाही हे नंतर च्या पालकमंत्री,तत्कालीन मंत्री खासदार यांचे अपयश आहे हे आधोरेखीत आसतानाच दहा वर्षां पुर्वी झालेला जल संपदाच्या कोटी रुपयांचा घोटाळा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आणि म्हसाडी धरणाचे काय झाले आसा सवाल वासिय विचारत आहेत.
रोहा तालुक्यातील चणेरा विभाग हा प्रचंड मागास आहे. रोजगारांची संधी नाही.चणेरा विभाग अधिक मागास राहायला,रोहा अलिबाग चे विरोधाभास राजकारण कारणीभूत आहे.विभागात मोठा प्रकल्प येण्याचे सुतोवाच मिळतात अधी प्रचंड विरोध नंतर ठेकेदारी साठी च्या भांडणात अलिबाग राजकारण कायम वरचढ राहीला. म्हसाडी धरणालाही वाढता विरोध राहीला.या विरोधाला न जुमानता उप मुख्यमंत्री अजित पवार,सुनील तटकरेनी धरणाच्या कामाचे जोरात भूमीपूजन केले.काही एकर जमिनी संपादन प्रक्रियेला प्रारंभ झाले.मात्र धरणाला कसलीच परवांगी नव्हती मग धरणाचे भूमीपूजन कसे करण्यात आले.ठेकेदार नेमण्यात आला.त्यानंतर जलसंपदा घोटाळा समोर आला आणि म्हसाडी धरणाला ग्रहणलागले. अघारीची सत्ता ही गेली,आश्यात धरणाचा ठेका दिलेल्या खत्री चे करोडो रुपये धरणात अडकले,हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.नंतर म्हसाडी धरणाची चर्चा थांबली,हे आसताना सिंचन घोटाळा चौकशीचे सुतोवाच भाजप चे मोहित कंबोज यांनी दिले आणि म्हसाडी धरण पुन्हा बोलुलागला.म्हसाडी धरणाचे काय झाले? असा सवाल चणेरा वासीय खासदार सुनील तटकरे,नुकताच माजी झालेल्या पालक मंत्री यांना करीत आहेत. सिंचन घोटाळ्यात म्हसाडी धरण रखडले,बल्क फार्मा प्रकल्प आले पाहिजेत असे प्रयत्न अमदार खासदार यांनी केला नाही.
त्यात ही म्हसाडी धरणाचे काय झाले? यावर अजित पवार मुख्यत:सुपुत्र खासदार सुनील तटकरेंनी उत्तर द्यावेत आशी मागणी चणेरा वासीयानी केली,दरम्यान सिंचन फाइल्स नव्या चर्चेत म्हत्वकांक्षी म्हसाडी धरण होणार कधी?याची प्रतिक्षा मागास,तहानलेल्या चणेरा वासीयांना कायम असल्याचे आधोरेखीत झाले आहे.