सुसाइड नोट लिहून जळगाव येथील वृद्धने हाताची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न
मिडिया वार्ता न्यूज
जळगाव ब्युरो चीफ
विशाल सुरवाडे
9595329191
जळगाव- सुसाइड नोट लिहीत वृद्ध व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे घडली. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरितच घटनास्थळी धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे (७२) हे श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील बाकावर बसलेले असताना सुसाइड नोट लिहून स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले. ही घटना उद्यानातील काही नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे संजय बडगुजर यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील पांडे यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता बरी असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले असून, पांडे हे मनोरुग्ण असल्याने त्यांनी असे केल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सुरेश पांडे यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिले होते की “एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करत आहे. यात कोणीही दोषी नाही. मला ९० टक्के दिसत नाही. या आजारपणाचा आता कंटाळा आला आहे. त्यासाठी मी स्वत: जबाबदार आहे, धन्यवाद. असे लिहून सुरेश पांडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.