मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतली मागणीची दखल…
✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की यंदाचा पावसाळा चंद्रपूरकरांसाठी मोठे संकट घेउन आले. या पावसाने आलेल्या पुरानेझ अनेकांची शेतपिके पाण्या खाली गेली तर शहरातील अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे सदर कुटुंब उघड्यावरती आले. सदर घरांचे पंचनामे करुन त्यांना शासकिय मदत करण्यात आली. मात्र यातील अनेक घरे ही नजुलच्या जागेवर असल्याने त्यांना केवळ पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही मदत अत्यंत कमी आहे. तेव्हा अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मिळत असलेली 5 हजार रुपयांची शासकिय मदत अत्यंत कमी असुन ती वाढविण्यात यावी अशी मागणी पावसाळी अधिवशेनात बोलतांना केली होती. याची तात्काळ दखल घेत सदर मदत 5 हजाराहुन 15 हजार करण्याची घोषणा मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आपले आभार!