मेडीगड्डा प्रकलप सर्व पिडीत शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आमरण सुरुवात

मेडीगड्डा प्रकलप सर्व पिडीत शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आमरण सुरुवात

मेडीगड्डा प्रकलप सर्व पिडीत शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आमरण सुरुवात

अमितकुमार त्रिपटी
अहेरी-उप जिल्हा प्रतिनिधि
मोबाईल 9422891616

सिरोंचा: – तेलंगाना सरकारचे मिशन भगीरता अंतर्गत सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे गत चार वर्षात आधी मेडिकट्टा धरणाचे बांधकाम पूर्ण केले त्यानंतर दरवर्षी म्हणजे मागील तीन वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील अनेक गाव बॅक वॉटर पुढे अनेक शेतकऱ्यांचे शेतजमीन सह आपल्या कुटुंबासह पूरपीडित झाले मात्र शासन प्रशासनाने मागील तीन वर्षांपासून अनेक निवेदन दिल्यानंतरही या गंभीर समस्या कडे दुर्लक्ष केले त्यामुळे गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गाव जलमय परिस्थिती निर्माण झाली होती यानंतर या परिसरातील जनतेन मध्ये शासनाप्रती एक प्रकारचा रोष निर्माण झाला होता याला कंटाळून अखेर आंदोलनाचा भूमिका पत्करावा लागला या अनुसंधाने आज सिरोंचा बस स्टँड येतील चौकातून तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पुढे निवेदनात म्हटले की महाराष्ट्र आणि तेलंगाना या दोन राज्याचा सीमेतून वाहणान्या गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या महाकाय मेडीगड्डा प्रकल्पाचा उदगाटाना नंतर गडचिरोली जिल्हामध्ये सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीवन जगणे कठीण झाले आहे. मेडीगड्ढा प्रकलप अंतर्गत बँक वाटर मुळे आरडा माल, मुगापूर, मृदूक्रिष्णापू, जानमपल्ली,मद्धिकुंठा, चितलपल्ली, नगरम, रामक्रिष्णापूर, सिरोंचा रे, सिरोंचा माल कारसपल्ली व इतर गावातील शेत जमिन बुडत असून या गावातील शेतजमिन भुसंपादनासाठी मंजूर होऊन तीन वर्षा होत असूनही अध्यापही भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. मात्र प्रकल्पाचा बँक वाटरचा फटका नेहमी बसत असल्याने शेतकन्यांना उपासमारीची पाळी निर्माण झालेली आहे.

मेडीगड्डा प्रकल्प मधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकटया सोमनूर, गुम्मलकोंडा, सोमनपल्ली, मुक्कीडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडामोटला, सुंकरअल्ली, आसरअल्ली, गोल्लागुडम, बोर्र्गुडम, जंगलपल्ली, बालमुत्यामपल्ली, अंकिसा लक्ष्मीदेवीपेठा, कंबालेपठा चिंतारेवुला, कोटापल्ली, पोचमपल्ली, रंगधामपेठा, गंजीरामपल्ली, नडिकुडा व इतर गावातील हजारो हक्टर शेत जमिन वाहून त्याचे नदीमध्ये रूपांतर झाले आहे. तरी काही लोक भूमीहीन झाले व काही लोक भुमिहीन होण्याचा मार्गावर आहे.

जुलै महिण्यात आलेल्या महाकाय असा पुराचा फटका सिरोंचा तालुक्यात मोठा प्रमाणात बसलेल्या आहे. या महाकाय असा पुराचा फटकाने सिरोंचा तालुक्यातील अनेक गावातील अनेकानेक कुंटूबांना रस्त्यावर आणून टाकलेली आहे. आजही त्या कुटुंब रस्त्यावरच आपला जीवन हातात धरून जगत आहे. अशा या परिस्थितीचा मुख्य कारण म्हणजे आपला तालुक्यातील बांधकाम झालेल्या मेडीगड्डा प्रकल्प ठरत आहे.

• मेडीगड्ढा प्रकल्पामुळे पिडीत शेतकऱ्यांचा प्रमुख व ज्वलंत मागण्या खालील प्रमाणे आहे.

1) मेडीगड्डा प्रकल्प अंतर्गत भूसंपादनासाठी मंजूरी झालेल्या शेत जमिनी तत्काळ भूसंपादनासाठी मंजूरी झालेल्या शेत जमिनी तत्काळ भूसंपादन करण्यात यावी. 2) भूसंपादनासाठी मंजूरी झालेल्या शेत जमिनी पेक्षा जास्त जमिन बँक वाटर मुळे बुडत, असल्यामुळे त्या जमिनीचा सर्वे करून भूसंदपान करण्यात यावी.

3) वारंवार पाणी सोडत असल्यामुळे अंकसा, आसरअल्ली व इतर 15-20 गावातील शेतकऱ्यांचे शेत जमिन कटून नदीत रूपांतर झालेली आहे. त्या जमिनीचा सर्वे करून भूसंपादन करण्यात यावी.

4) जमिन अधिक कराब होऊ नये यासाठी संरक्षण भींतीचे बांधकाम करण्यात यावी.

5) प्रकल्पातून पाणी सोडत असताना महाराष्ट्र कडील दरवाजे न उघडता प्रकल्पा मधील दरवाजे

उघडण्यात यावी. 6) पिडीत शेतकऱ्यांना प्रकल्प ग्रस्त म्हणून घोषित करून प्रकल्प प्रमाणपत्र देण्यात यावी.

7) मेडीगड्डा प्रकल्पा मुळे रस्त्यावर आलेल्या गावांना उपलब्ध शासकीय जागेत राहणीमाना करीता जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
वरील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे निवेदन तहसीलदार सिरोंच्या यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीना यांना सादर केले आहे यावेळी मेडीगड्डा प्रकल्प अंतर्गत पिडीत शेतकरी शेतमजूर अनेक युवक या मोर्चामध्ये सहभाग होऊन आणि आमरण उपोषणाला बसले आहे