केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर डि.ए. वाढ निश्चित

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
डि.ए. वाढ निश्चित

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर डि.ए. वाढ निश्चित

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

नवी दिल्ली,
केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. याबाबतची घोषणा भारत सरकारकडून लवकरच केली जाणार आहे. सरकार 28 सप्टेंबर रोजी महागाई भत्ता जाहीर करेल. ते सप्टेंबर महिन्याच्या पगारासह दिले जाईल. यादरम्यान कर्मचाऱ्यांना जुलै-ऑगस्टची थकबाकीही मिळणार आहे.

डीएमध्ये काय वाढ होणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए किती वाढणार? सरकार यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकातील डेटा वापरते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. जूनमध्ये निर्देशांक 129.2 वर होता. निर्देशांकातील वाढीमुळे महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार आहे. या वाढीमुळे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

डीएचे पैसे कधी येणार
महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए ३८ टक्के झाला आहे. वाढलेला डीए सप्टेंबर २०२२ च्या पगारात दिला जाईल. नवीन डीए १ जुलैपासून लागू होणार आहे. यात जुलै आणि ऑगस्टच्या थकबाकीचाही समावेश असेल.

महागाई भत्ता
महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्याने ती 38 टक्के होईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के भत्ता दिला जात आहे. डिए 38% असल्याने, पगारात प्रचंड वाढ होईल.