कृषिदुतांनी दिली रिसोड येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शैक्षणिक भेट

कृषिदुतांनी दिली रिसोड येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शैक्षणिक भेट

कृषिदुतांनी दिली रिसोड येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शैक्षणिक भेट

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
वाशिम /रिसोड

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला संलग्नीत कृषी महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील कृषीदुत व कृषीकन्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड *२०२२-२३* या अनुषंगाने रिसोड येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली व शाखा व्यवस्थापक एस. एम. ठाकूर यांच्याकडून व तसेच तेथील कर्मचारी वर्ग बी. बी. धनगोल ( बँकिंग अधिकारी ) , रोखपाल एम. एस. चौरे, लिपिक धिरज रंगारी, वैभव घोयर यांच्याशी संवाद साधून शाखेतील कार्यप्रणालीचा आढावा आणि तसेच तेथे आलेल्या शेतकऱ्यांकडून सुध्दा त्यांचे मत जाणून घेतले…
यावेळी कृषिदुत पवन भगवान जाधव ,विपुल प्रमोद भगत, गोपाल दिपक सोनवणे सागर देविदास केसकर व कृषीकन्या आरती विठ्ठल गाडेकर , मेघा विनायक भांगे , शिवाणी प्रकाशराव पवार यांनी शाखा व्यवस्थापक एस.एम. ठाकूर यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यासाठी अद्ययावत असलेल्या विविध पिक योजना, कृषि कर्ज योजना जसे की अल्प मुदती कर्ज , मध्यम मुदतीचे कर्ज , शेतीसाठी उपयोगी असणारे विविध अवजारे जसे की मळणीयंत्र, ट्रॅक्टर तसेच जलसिंचन साठी शेततळे , विहीर खोदकाम , कूपनलिका यासाठी अद्ययावत असणाऱ्या विविध योजना संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता ,कागदपत्रे व त्याची प्रक्रिया आणि विद्यमान पीक आराखड्या बाबत माहिती घेतली . या भेटीसाठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ .आशिष अप्तुरकर , मा.आर.एस.डवरे ( विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड ) , प्रा.डी. डी. मसुडकर ( RAWE कार्यक्रम समन्वयक ) , प्रा.आर. वाय . सरनाईक ( कार्यक्रम अधिकारी ) , यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.✍