जिवती येथील विदर्भ कोंकण बँक येथे आदिवासी कोलाम बांधवांचा पिक कर्जासाठी कुलूप बंद आंदोलन बॅंकेने पीक कर्ज देतो म्हणून आमची आर्थिक लूट केली वनहक्क पट्टे धारकांनी मांडली व्यथा

जिवती येथील विदर्भ कोंकण बँक येथे आदिवासी कोलाम बांधवांचा पिक कर्जासाठी कुलूप बंद आंदोलन

बॅंकेने पीक कर्ज देतो म्हणून आमची आर्थिक लूट केली

वनहक्क पट्टे धारकांनी मांडली व्यथा

जिवती येथील विदर्भ कोंकण बँक येथे आदिवासी कोलाम बांधवांचा पिक कर्जासाठी कुलूप बंद आंदोलन बॅंकेने पीक कर्ज देतो म्हणून आमची आर्थिक लूट केली वनहक्क पट्टे धारकांनी मांडली व्यथा

✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282

जिवती : – तिन महिन्यापासून बँकेचे उंबरठे झिजवून सुद्धा हाती नाही पीक कर्जाची रक्कम जिवती तालुक्यातील काकबन, भुरियेसापूर, टाटाकोहाड, सिंगरपठार, शेडवाही येथील वनहक्क पट्टे धारक जिवती येथील विदर्भ कोंकण ग्रामिण बँकेत तीन महिन्यापासून उंबरठे झिजवीत आहेत.मात्र बँकेचे व्यवस्थाक दिडवलकर यांना काही देने घेणे नसल्याचे चित्र आहे.
तीन महिन्यापासून बँकेचे उंबरठे झिजवीत असून यात आमचे प्रचंड पैसे गेले असून बँकेला स्टॅम्पपेपर, नादेय प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा पीक कर्ज दिल्या जात नाही यामुळे या बँकेने आमची आर्थिक लूट केली असल्याचे पर्वताबाई कांशीराम चाहकाटी या वनहक्क धारक महिलेने आपली व्यथा मांडली.

यावेळी बँकेच्या गेट ला कुलूप लावून कुलूप बंद आंदोलन करण्यात आला यामुळे व्यावस्थापकांनी पोलिसांना बोलविले.

बँकेत वनहक्क धारकांना पिक कर्जाच्या मागणीसाठी अफ्रोट संघटनेचे डॉ. मधुकर कोटनाके, श्रमिक एल्गारचे घनश्याम मेश्राम, बिरसा क्रांती दलाचे संतोष कुलमेथे यांच्या नेतृत्वात वनहक्क धारकांना घेऊन ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून पीक कर्ज मिळेपर्यंत बँकेतून जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने बँकेच्या व्यवस्थापकाची तारांबळ उडाली व्यवस्थापकांनी चंद्रपूर येथील त्यांचे अधिकारी खाडे यांना फोन करून प्रकरणाचे गांभीर्य कळविले आहे खाडे यांनी चंद्रपूर येथून जिवतीला येऊन प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली असून पिक पिक कर्ज न दिल्यास बँकेसमोर पेंडाल टाकून बेमुदत आंदोलन सुरू करणार असल्याची भूमिका डॉ. मधुकर कोटनाके यांनी घेतली आहे.