मनसेच्या जोरदार दणक्यामुळे महाड औद्योगिक क्षेत्रातील श्रीहरी केमिकल्स कारखाना बंद करण्याचे आदेश

62

मनसेच्या जोरदार दणक्यामुळे महाड औद्योगिक क्षेत्रातील श्रीहरी केमिकल्स कारखाना बंद करण्याचे आदेश

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-मागील जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात महाड शहरातील भोईघाट येथील सावित्री नदीपात्रामधील पाणी केमिकलमुळे दूषित झाल्याने अनेक मासे मृत्युमुखी पडले होते त्याचप्रमाणे आजूबाजूच्या रहिवाशांना दुर्गंधी,भांडी काळी पडणे अशा आणि अन्य आरोग्यविषयक तक्रारींचा सांमना करावा लागत होता.

या नदीतील मासेमारीवर उपजीविका असणाऱ्या आदिवासी व मच्छीमार बांधवांचे यामुळे खूप नुकसान होत होते.

ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून सदर नदीपात्राची पाहणी करण्यास सांगितले त्याचप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या संबंधित कारखान्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली..

मनसेच्या या धडक पवित्र्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली असून त्यामुळे महाड औद्योगिक क्षेत्रातील श्रीहरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड या रासायनिक कारखान्यास पर्यावरण सुरक्षिततेचे निकष व नियम न पाळल्यामुळे बंदीची नोटीस जारी करण्यात आली आहे तर हाईकल केमिकल या कारखान्यास पर्यावरण व प्रदूषण नियमाबाबत कडक सूचना करण्यात आल्या असून जर त्यावर पुढील 15 दिवसात सकारात्मक बदल दिसून न आल्यास या कारखान्यावर देखील कारवाई करण्याचे संकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या महाड विभागाच्या सब रिजनल ऑफिसर सौ.इंदिरा गायकवाड मॅडम यांनी दिले आहेत.श्रीहरी केमिकलचा विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश सुद्धा मंडळामार्फत संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

मनसेमुळे झालेल्या या कारवाईमुळे महाडकर नागरिक,आदिवासी व मच्छीमार बांधव यांनी मनसेचे आभार मानले असून या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.. यावेळी मनसेतर्फे 

दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर मनविसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रतीक रहाटे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण ,यश जाधव व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.